आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीत दिमाखात लोकार्पण संपन्न!
रिसोड (ST Bus) : रिसोड येथील एस टी आगारामध्ये अपुऱ्या बसेस मुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड हाल होत होते. रिसोड एस. टी. आगारामध्ये या आधी फक्त 41 बसेस उपलब्ध असुन, त्यापैकी काही शिवशाही, विठाई व मानव विकास अंतर्गत चालत असल्याने नियमित बस फक्त 27 असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसत होते. या संदर्भात रिसोड-मालेगांव विधान सभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी योग्य वेळी पाठपुरावा केल्याचे फलती म्हणुनच रिसोड आगाराला पाच लालपरी बस (Laalpari Bus) प्राप्त झाल्या आहेत.
रिसोड एस. टी. आगाराला नुकत्याच 5 नवीन लालपरी एसटी बसेस मिळाल्या!
हे विविध वाशिम जिल्ह्यातील सर्व एस. टी. आगाराला नवीन 5 लालपरी बसेस मिळाल्या. परंतु रिसोड एसटी आगाराला (Resod ST Depot) लालपरी एस. टी. बस केव्हा मिळणार असा प्रश्न प्रवासी करीत होते. रिसोड एस. टी. आगाराला नुकत्याच 5 नवीन लालपरी एसटी बसेस मिळाल्या असुन, त्यांचा आज लोकार्पण सोहळा आमदार अमित झनक (MLA Amit Janak) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रिसोड एस. टी. आगाराचे आगार व्यवस्थापक निलेश बोदडे, सहाय्यक आगार व्यवस्थापक आशु काळे यांच्यासह रिसोड एस. टी. आगारातील चालक, वाहक, मेकॅनिकल व सर्व कर्मचारी तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिसोड एसटी आगाराला मिळालेल्या लालपरी एस. टी. चा लोकार्पण सोहळा एस. टी. मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हस्ते करण्यात आला असुन, यावेळी प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.