नेर येथील स्टेट बँकेत मध्यरात्री घडले थरारनाट्य!
नेर (State Bank Robbery ) : नेर शहरातील यवतमाळ रोडवरील भारतीय स्टेट बँक (State Bank of India) शाखेत मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. दीड ते दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकेत जबरदस्त चोरीचा प्रयत्न केला. त्यांनी खिडकीचे लोखंडी बार कापून आत प्रवेश केला. आणि बँकेतील लॉकरचे कुलूप (Locker Lock) निकामी करण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या मुख्य कार्यालयातील डीव्हीआर (DVR) ही ते चोरून घेऊन गेले. तसेच अलमारीचे कुलूप ड्रिल मशीनच्या (Drill Machine) साहाय्याने तोडून नासधूस केली. तर बँकेतील इतर कर्मचाऱ्यांचे ड्रॉस्प व फाईलांची नासधुस केली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
या चोरट्यांनी बँकेतील सायरन आणि सीसीटीव्हीच्या वायरही (CCTV Wire) कापून त्यांना निष्प्रभ केले. परंतु बँक लॉकर फोडण्यात त्यांना यश आले नाही. त्याच वेळी पोलीस प्रशासन (Police Administration) गस्तीवर असताना घटनास्थळी पोलीस गाडीचा सायरन (Siren) अचानक वाजू लागल्यामुळे चोरट्यांनी तात्काळ पळ काढला. पोलिसांच्या या वेळीच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले.
चोरीप्रकरणात सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान!
या चोरीप्रकरणात सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नेर पोलिस व नेर येथील बँकेचे व्यवस्थापक धनराज देशमुख यांनी वर्तवला आहे. मात्र, मोठा आर्थिक फटका टळला, हे निश्चितच आहे. या प्रकरणी स्टेट बँक चे कर्मचारी कोमल खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 305 ए, 331/4 अंतर्गत गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
ही घटना नेर शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करते!
या घटनेचा अधिक तपास नेर पोलीस स्टेशनचे (Ner Police Station) ठाणेदार अनिल बेहेराणी व सहाय्यक पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस पुढील तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिक माहितीचा आधार घेत आहेत. ही घटना नेर शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, नागरिकांमध्ये (Citizens) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँक आणि महत्त्वाच्या संस्थांनी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
तवेरा गाडीतील 5 चोरटे सीसीटीव्हीत कैद–
फ्रीजमधील कोल्ड ड्रिंक पिऊन पसार!
नेर शहरात चोरट्यांनी धाडसी चोरी (Theft) करण्याच्या प्रयत्नांत पोलिसांना आव्हान दिले आहे. तवेरा प्रकारची चारचाकी गाडी घेऊन आलेल्या पाच चोरट्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, वाहनाचा फोटो आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर गाडी अमरावती रोड कडे जाताना दिसली. घटनास्थळी बँकेचे व्यवस्थापक धनराज देशमुख यांनी तातडीने भेट दिली. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करताना फ्रीजमधील 6 कोल्डिंगच्या बाटल्या पिल्याचेही निदर्शनास आले. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा तपास घेत आहेत.