हिंगोली (Illegal liquor sale) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्री गणेशस्थापने निमित्त कोरडा दिवसाच्या अनुषंगाने २६ व २७ आँगस्ट रोजी सेनगांव, कळमनुरी, हिंगोली, वसमत, औंढा परिसरात सामुहिक मोहीम राबवत अवैध मद्य विक्री व वाहतुक विरोधात छापे टाकून ९ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करत अवैध मद्य व दोन दुचाकी असा एक लाख ५७ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ व २७ आँगस्ट रोजी श्रीगणेश स्थापने निमित्त कोरडा दिवस असल्याने सामुहिक मोहीम राबवुन निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, हिंगोली तसेच दुय्यम निरीक्षक हिंगोली यांचे पथकाने सेनगांव, कळमनुरी, हिंगोली, वसमत, औंढा परिसरात अवैध मद्य विक्री (Illegal liquor sale) व वाहतुक विरोधात छापे टाकून ९ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंद केले.
सदर कारवाईत (Illegal liquor sale) देशी मद्याच्या २८२ बाटल्या, विदेशी मद्याच्या २५ बाटल्या व २ दुचाकी वाहन असा एकुण एक लाख ५७ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, निरीक्षक भरारी पथक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी.बी. शेख, कृष्णकांत पुरी (बिट क्र.१ व ३), .प्रदिप गोणारकर (बिट क्र. २), तसेच कांबळे, जवान आडे, राठोड आदींनी पार पाडली.