बाबासाहेबांचे संविधान खरं ‘रामराज्य’ घडवण्याचं आधुनिक साधन- सपकाळ
बुलढाणा (Kalaram temple) : मंदिर प्रवेशासाठी ज्याठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता त्याच ऐतिहासिक नाशिक येथील (Kalaram temple) काळाराम मंदिरात, त्याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत घेऊन (Congress State president) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रामनवमीच्या दिवशी स्थानिक खासदार शोभाताई बच्छाव आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सोबत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन नवा इतिहास घडविला. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं (Indian Constitution) संविधान हेच खरं ‘रामराज्य’ घडवण्याचं आधुनिक साधन असल्याचं म्हटलं !
श्रीरामांचे नाव घेताना बहुतेकजण युद्ध, बाण, सत्ता आणि मंदिराची आठवण करतात.. पण माझ्या डोळ्यांसमोर ‘रामराज्य’ म्हणजे सामाजिक न्याय, सत्य आणि सर्वांना समान मानणारी व्यवस्था उभी राहते.. असे यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. (Kalaram temple) काळाराम मंदिर जिथे हजारो वर्षांचा छळ, अन्याय आणि अस्पृश्यतेविरुद्ध डॉ. बाबासाहेबांनी संघर्ष केला, तिथे आज संविधानाची प्रत घेऊन मी उभा राहिलो.
कारण हा संघर्ष अजून संपलेला नाही, तो केवळ स्वरूप बदलून समोर येतोय.. असे त्यांनी यावेळी सांगून रामनवमी म्हणजे केवळ उत्सव नाही तर ती एक आठवण आहे की, सत्यासाठी उभं राहणं हाच खरा धर्म आहे. (Kalaram temple) श्रीरामांना मंदिरात ठेवून संविधानाला झाकणाऱ्यांना सांगायचं आहे. आम्ही दोघांनाही उघड्या हातात घेऊन चालतो. कारण आमचा रामही समतेचा आहे, आणि आमचं संविधानही!.. अशा भावना त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत !




