विदर्भातील वर्धा जिल्ह्यातून केला हस्तगत
आखाडा बाळापूर (Stolen Trailer) : जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलीस पथकाने वारंगाफाटा पेट्रोल पंपाजवळून चोरी गेलेला २०लाख कीमतीचा (Stolen Trailer) ट्रेलर ट्रक विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्थानक हद्दीतून जप्त करून गुरुवारी सकाळी आणला. सदर चोरी छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व सायबर सेल पथकाची पोलिसांना मदत मिळाली यामुळे आठवडाभरात चोरी गेलेला मुद्देमाल मिळाला. सदर प्रकरणात आरोपी शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वारंगाफाटा बालाजी पेट्रोल पंप समोर रस्ता बाजूला मीत ट्रान्सपोर्ट मध्ये (Stolen Trailer) चालणारा ट्रेलर जीजे १२ बी डब्ल्यू ७९१३ कीमत २०लाख हा उभा केलेला होता ३०जुलै पहाटे तिन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. सदर प्रकरणी कैलास दान दुर्गा दान गडवी रा.गुजरात राज्य फीर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात १ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते तपास सुरू केला होता.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपाधीक्षक राजकुमार केंद्रे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सपोनी ज्ञानेश्वर बसवंते, बिटप्रमुख शेख बाबरभाई पथकाने महामार्गावर वारंगा फाटा, बामणी फाटा, उमरखेड, डीग्रस, दारव्हा, पुसद ,पुढे सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून तपास केला सायबर सेल प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे व पथकाने यात सहकार्य केले.
या शोध मोहीम मधून सपोनी ज्ञानेश्वर बसवंते यांनी ट्रेलर पुलगाव पोलीस स्थानक हद्दीत उभा आसल्याची माहिती काढून बुधवार रात्री सपोनी ज्ञानेश्वर बसवंते, शेख बाबरभाई, बालाजी जोगदंड, शाम वाढोणकर पोलीस पथकाने ट्रेलर (Stolen Trailer) ताब्यात घेतला आरोपी मात्र आधीच पसार झाले होते. खाजगी चालकाच्या सहाय्याने ट्रेलर आज बाळापूर पोलीस स्थानकात आणण्यात आला. आठवडाभरात पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सपोनी ज्ञानेश्वर बसवंते पथकाने वीस लाखाच्या चोरीचा छडा लावला.
चोरट्यांनी टोल चुकवत नेला
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथून चोरी करण्यात आलेल्या ट्रेलर चोरट्यांनी महामार्गावर टोल चुकवत चुकवत नेला अस पोलीस तपासात दिसून आले आहे.सदर प्रकरणात आरोपी व त्यांना सहाय्य करणारे मागावर पोलीस पथक आहे.




 
			 
		

