परभणी शहराच्या जुना पेडगाव रोड बालाजी नगर परिसरात चार ते पाच जणांना घेतला चावा…!
परभणी (Parbhani loose dog) : मागील काही दिवसा पासून परभणी शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. जुना पेडगाव रोडवरील बालाजी नगरात चार ते पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. (Parbhani loose dog) मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे शहर महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरीक संतप्त भावना व्यक्त करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था परिसरात मोकाट पशु, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शहर महापालिकेवर असते. यासाठी परभणी शहर महापालिकेने एजन्सी देखील नियुक्त केली आहे. मात्र परभणी शहरातील (Parbhani loose dog) मोकाट कुत्र्यांची समस्या सुटत नसल्याचे दिसत आहे. जुना पेडगाव रोडवरील बालाजी नगर परिसरात २० ते २५ मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. पादचारी नागरीक, दुचाकीवरील व्यक्ती, लहान मुलं यांच्या अंगावर कुत्रे धावून जात आहेत. कुत्र्यांना हकालण्यासाठी गेल्यावर कुत्रे हल्ला करत असल्याचे दिसत आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे बालाजी नगर परिसरात रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या भागातील नागरीकांनी महापालिका आयुक्तांना या बाबत निवेदन देण्याचे ठरविले असून त्या संदर्भात बैठक देखील घेण्यात येणार आहे. या बैठकीला परिसरातील रहिवाशांनी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाचे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष होत असून या प्रकारामुळे रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
चार हजार व्यक्तींना कुत्र्याचा चावा
परभणी जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ३ हजार ९७२ व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. एकट्या जुलै महिन्यात ५२९ व्यक्तींना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. (Parbhani loose dog) मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज सारखा गंभीर स्वरुपाचा रोग होतो.