हिंगोली (Hingoli Cemetery) : तालुक्यातील देवठाना येथे स्मशानभूमीच्या शेडचे बांधकाम करण्यात आले नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे येथे (Hingoli Cemetery) स्मशानभूमीच्या शेडचे बांधकाम करावे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे हिंगोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कडे दिला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हिंगोली तालुक्यातील देवठाना येथे स्मशानभूमीच्या शेडचे बांधले नसल्याने मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने त्याचा गावकर्यांना त्रास होत आहे. यामुळे येत्या आठ दिवसामध्ये (Hingoli Cemetery) स्मशानभुमी बंधण्यात यावी. जर येत्या आठ दिवसात स्मशानभूमीचा प्रश्न सोडवलात आला नाही तर ११ सप्टेंबर पासून जोपर्यंत स्मशानभूमीचे बांधकाम होणार नाही. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया-समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यात जिवाचे काही बरे वाईर झाल्यास त्याला पंचायत समिती हिंगोली यांची सर्वस्वी जबाबदारी राहिल असे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते मुनिर पठाण, भिमाबाई मनवर धवसे, कविता योगीराज इंगोले, आम्रपाला साहेबराव धवसे, सिंधुबाई बालाजी इंगोले, वैशाली सुरेश धवसे, बेबाबाई धाबे, शांताबाई भगवान कांबळे, दर्शना गोंविदा दिपके, अर्चना पंजाब दहिसमुद्र, ममता अनिल दहिसमुद्र, सुजाता जनार्धन धवसे, सुमनबाई शिवराम धवसे, ज्योती राजु धवसे, वनिता उमेश धवसे, शोभा भारत धवसे, ताई परसराम खिल्लारे, वर्षा राहुल धवसे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.