तहसीलदार प्रशांत गडृम यांना निवेदन
कोरची (Farmers loan waiver) : किसान ब्रिगेडच्या वतीने कर्जमुक्तीचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकरी बांधवांनी दि. २६ मे रोजी तहसील कार्यालयावर धडक देवून तहसीलदार प्रशांत गडृम यांना निवेदन दिले.
भाजपा महायुती घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचे वचनपूर्ती नाम्यात उल्लेख केला होता. तसेच जाहीर प्रचार सभेत कर्जमुक्तीचे (Farmers loan waiver) आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र महायुतीची सत्ता स्थापन होवून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी कर्जमुक्तीबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
उलट महायुती घटक पक्षातील नेते शेतकऱ्यांना कर्ज भरणा (Farmers loan waiver) करण्याचे सुतोवाच केले आहे. सत्ताधारी सरकारने दिलेले आश्वासन, पडलेले शेतमालाचे भाव, वाढती महागाई व नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जमुक्तीची दिलेल्या आश्वासनाची पूर्तता शासनाने करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकनायक, शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांनी किसान ब्रिगेडची स्थापना करून कर्जमुक्ती अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती अर्ज तहसीलदार याच्याकडे सादर केले.
वैश्विक तापमान बदलामुळे दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहे. सरकारच्या (Farmers loan waiver) शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतीमालाचे भाव सतत पडले आहे. तसेच कृषी मालवरील जीएसटी आकारणी मुळे उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने आत्महत्या करण्यास परावृत्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती घटक सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, यासाठी शेतकरी पेटून उठला आहे.
निवेदन देतेवेळी प्रभाकर कराडे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, सामसाय बोगा, सौ.रनोबाई कोरेटी, बाबुलाल अंबादे, प्रेमलाल उईके, अंताराम वालदे,घनश्याम राऊत,,जनार्धन तिरगंंम, भिकम फुलकवर,सौ.धनसिंग दुधनाग,कुशल बंजार,अमरु मडावी,रमेश थाट, मनिषा दरवडे,हरिराम सिंद्राम,शंकर जनबंधु,मोहन साखरे, देवराव बंजार,अंतराम वालदे, परसराम राऊत,,प्रेमलाल उईके,मदनसिंग कपुरडेहरिया,जीवनाल नुरूटी, किरपाराम सोनकुकरा, तुरसाबाई करंमकार, गीरीष अडभैया, सदाराम मडावी,कुमलाल गगांभोईर,ताराबाई किचंन, सुकराम बोगा, दै.देशोन्नती तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल नखाते कोरची आदीसह इतर शेतकरी उपस्थित होते.