हिंगोली (Hingoli Police Raid) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली (Hingoli Police Raid) हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा पोलिस यांनी हिंगोली शहरातील शाळांच्या चारही बाजूने १०० मीटरच्या परिसरातील १० पान टपर्यावर ८ ऑक्टोंबर रोजी धडक कार्यवाही करण्यात आली.

ह्या कार्यवाहीत एकूण रु. २७००/- दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ह्या आधीच शाळेच्या आवारातील पान टपर्यांवर कार्यवाही करण्याबाबत आदेश जारी केले होते, त्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली. (Hingoli Police Raid) जिल्हाभरात ही कार्यवाहीची मोहीम चालूच राहणार आहे. ही कार्यवाही जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या नव नियुक्त अधिकारी जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्या सोबत आनंद साळवे (सोशल वर्कर), मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, शहर पोलिस ठाणे येथील शंकर ठोंबरे (नाईक पोलिस शिपाई), गणेश वाबळे आदींचे सहकार्य लाभले.




