Yawatmal Tiger news :- यवतमाळ शहरापासून आठ ते नऊ कि.मी.दूर अंतरावर असलेल्या भारी-मडकोना-मुरझडी शेतशिवारामध्ये पट्टेदार वाघाचा (tiger) वावर असल्याची चर्चा मागील पंधरा दिवसांपासून स्थानिकांमध्ये सुरु होती. भारी-मुरझडी रस्त्यावरील गिट्टी खदाणीमध्ये वाघाचा डेरा असल्याचेही बोलले जात आहे. आज एक शेतकर्याने त्याच्या शेतालगतच्या भागामध्ये पट्टेदार वाघ बघितला व तो मोबाईलमध्ये कैद केला. त्यातून यवतमाळ शहरा लगतच्या गावकुसामध्ये पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट होत असून वनविभागाकडून (Forest Department) वाघाच्या बंदोबस्ताकरीता उपाययोजना करण्याची मागणी गावकर्यांकडून होत आहे.
वनविभागाकडून वाघाच्या बंदोबस्ताकरीता उपाययोजना करण्याची मागणी गावकर्यांकडून होत आहे
यवतमाळ वनक्षेत्राअंतर्गत यवतमाळ शहरापासून आठ ते नऊ कि.मी.अंतर असलेल्या भारी,मडकोना व मुरझरी शेतशिवारामध्ये वाघ असल्याची चर्चा शेतकरी व शेतमजूरांमध्ये होती.वाघाच्या भितीमुळे शेतकरी व शेतमजुर हे कामासाठी शेतावर जाण्याचे टाळत होते. अनेकांनी वाघाच्या डरकाळ्या ऐकल्या होत्या मात्र प्रत्यक्ष वाघ पाहिलेला नव्हता. मात्र आज शेतकर्यांने प्रत्यक्ष पट्टेदार वाघ मोबाईलमध्ये कैद केल्याने,परिसरामध्ये वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतात जायचे कसे आणि शेतीची कामे करायची अशी कसा प्रश्न स्थानिक शेतकर्यांना पडला आहे. तेव्हा वनविभागाने शेतशिवारामध्ये वास्तव्यास असलेल्या वाघाचा बंदोबस्त करून शेतकर्यांना चिंतामुक्त करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.