परभणी(Parbhani) :- कृषि विद्यापीठातील(Agricultural University) पशुवैद्यकीय महाविद्यालयासह राज्यभरातील ५ शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मागील ३ दिवसापासून बेमुदत संपावर गेल्यामुळे राज्यातील पशु चिकित्सालयांची (Veterinary clinics) सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
खाजगी महाविद्यालय सुरू न करण्याची मागणी
राज्यभरातील ५ शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील ज्यामध्ये परभणी, नागपुर, मुंबई, शिरवाल, उदगीर यांचा समावेश आहे. यातील जवळपास ४ हजार विद्यार्थी बेमुदत संपावर गेले असून त्या विद्यार्थ्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्न पशुचिकित्सालयावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पशुचिकित्सलयाचे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्य सरकार(State Govt) खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देत असल्यामुळे भविष्यात बेरोजगारांची या क्षेत्रातील संख्या वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय पशु महाविद्यालय सुरू असतांना नविन खाजगी महाविद्यालयांना मान्यता देण्याची काय गरज आहे. असा सवाल संप करणार्या विद्यार्थ्यांनी विचारला आहे. राज्य सरकार चुकीच्या माहितीच्या आधारे खाजगी महाविद्यालय सुरू करून गरज नसतांना पशुवैद्यक (Veterinarian) निर्माण करून बेरोजगारीमध्ये भर पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापेक्षा प्रस्तावित शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यावर भर द्यावा आणि खाजगी महाविद्यालये सुरू करण्यास दिलेल्या परवानगी बद्दल पुनर्विचार करावा. या मागण्यांसाठी राज्यातील ५ शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मागील ३ दिवसापासून संपावर आहेत. त्यामुळे त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.