दिपावलीच्याा सुट्ट्यांचे पत्र तारखांचा मेळ बसेना
परभणी (Parbhani Education department) : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या दिपावली सुट्ट्यांच्या पत्रामध्ये वार आणि तारीख याचा मेळ बसत नसल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दरवर्षी उन्हाळी व दिपावली सुट्ट्यांचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने केले जाते. या वर्षाच्या अत्यंत महत्वाच्या सणासणासाठी साधारणत: वीस दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन केले जाते. यानुसारच सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना २८ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. १७ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने जिल्ह्यातील शाळांमधील दुसर्या सत्राच्या शाळा १८ नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहेत.
सुट्ट्यांचे परिपत्रक प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल पोलास व माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरâड यांच्या स्वाक्षरीने काढलेले आहेत. दोन्हीही शिक्षणाधिकारी यांच्या नजरेतून पत्र गेलेले असताना २८ ऑक्टोबर रोजी सोमवार आहे. परंतू परिपत्रकात गुरुवार २८ ऑक्टोबर असे नमुद केले आहे. वास्तविक गुरुवारी ३१ ऑक्टोबर तारीख आहे. त्यामुळे सुट्ट्यांच्या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एवट्या मोठ्या चुकीच्या नंतर सुध्दा शिक्षण विभागाकडून कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आलेली नाही. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकडून सुट्ट्यांचे नियोजन केले जाते. या पत्रामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक गोंधळून गेलेले आहेत.
कारभार सुधारेना
परवाच माध्यमिक शिक्षण विभागात मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर यांनी झाडाझडती घेत शिक्षणाधिकार्यांना धारेवर धरले होते. व आपला कारभार सुधारण्याबाबत तंबी दिलेली होती. असे असतांना सुध्दा या पत्राने पुन्हा एकदा शिक्षण विभागाने आपल्या ढिसाळ कारभाराचा नमुना प्रस्तुत केला आहे.