वाळू उत्खनन थांबवण्याची मोठी जबाबदारी!
परभणी (Sub-Divisional Officer) : परभणीच्या पाथरीत राज्य शासनाच्या (State Govt) आदेशानुसार श्रीमती संगीता चव्हाण-तावदरे यांची पाथरीसाठी उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी या संदर्भात आदेश निघाला आहे. त्या यापूर्वी परभणीत उपजिल्हाधिकारी (राजस्व) म्हणून कार्यरत होत्या. पाथरी उपविभागात पाथरी, मानवत व सोनपेठ हे 3 तालुके येतात. या भागातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध वाळू उत्खननावर (Illegal Sand Mining) नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी आता नव्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर असणार आहे.
महसुलच्या डोळ्यात धुळफेक करत वाळू चोरी सुरूच!
स्थानिक पातळीवर अनेकदा तक्रारी (Complaints) असूनही महसुलच्या (Revenue) डोळ्यात धुळफेक करत वाळू चोरी (Theft of Sand) सुरूच असल्याने प्रशासनाची (Administration) कारवाई ही अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांची कार्यशैली या बाबतीत निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचा साडेतीन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची 30 मे रोजी जालना जिल्ह्यात बदली झाली. त्यानंतर, प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणुन जीवन डापकर रुजु झाले होते .