राज्यभरातुन ३७५ खेळाडुंचा सहभाग; रविवारी समारोप व बक्षीस वितरण
हिंगोली (Sub-Junior Fencing) : येथील लिंबाळा मक्ता परिसरात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये (Sub-Junior Fencing) २७ वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर फेन्सिंग स्पर्धा दि.८ ते १० ऑगस्ट पर्यंत सुरू होती. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून तब्बल ३७५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून आज तिसर्या दिवशी छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्याचे स्पर्धकांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
२७ व्या सब-ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग (Sub-Junior Fencing) स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोप सोहळा रविवार दि.१० ऑगस्ट रोजी भव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी खा.ऍड.शिवाजी माने, हिंगोली जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी आ.गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष तथा राकॉं शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा टोकियो ऑलिंपिक निरीक्षक अशोक दुधारे, राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराजे जाधव सिंदखेड राजा, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव प्रा.डॉ.उदय डोंगरे, सहसचिव प्रा.डॉ.पांडुरंग रंणमाळ, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आयोजक कल्याण देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. सदरील स्पर्धा हिंगोली येथील जिल्हा क्रीडा बहुउद्देशीय इन डोअर संकुलात सुरू होत्या. अंतिम दिवशी राज्यातून आलेल्या अनेक संघांनी पात्र फेरीत प्रवेश करून पदकासाठीची अटीतटीची झुंज दिली. यामध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या तलवारबाजीचे कसब दाखविले.
वैयक्तिक निकालामध्ये सेबर प्रकारात मुलामध्ये प्रथम वेदांत काळे छत्रपती संभाजीनगर, द्वितीय ऋत्विक हुमाने भंडारा, तृतीय विराट जाधव बुलढाणा, तृतीय प्रिन्स भोवटे भंडारा, तर सांघिक निकाल सेबर संघ प्रकारात प्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्हा मानव जाधव, वेदांत काळे, प्रदीप कामठे, स्वराज भोसले. द्वितीय भंडारा जिल्हा, रुद्र घडोले, आर्व नागदेव, ऋत्विक हूमाने, प्रिन्स भोवटे,. तृतीय नागपूर आर्यन कातोरे, अभिनव गिरी, अन्य साहू, अब्दुल रहेमान, तृतीय सोलापूर स्वराज घाले, शिरीष घटघर, चैतन्य महाजन, मयूर भोसले.
तर मुलीमध्ये तसेच वैयक्तिक निकालामध्ये प्रथम श्रेया मोइम छत्रपती संभाजीनगर, प्रांजली कोरे सोलापूर, रिद्धी फणसे सातारा, अनन्या वारखडे सातारा. तर सेबर सांघिक मध्ये प्रथम सातारा आदिती वाघमारे, रिद्धी फणसे, अनन्या वारखडे. द्वितीय भंडारा आरोही इंगोले, वेदश्री पोलो, शासवी झुरमुरे, जान्हवी करंजकर, तृतीय सोलापूर खुशी लोढा, राजमंजुश्री शिंदे, स्वानंदी ताटे, प्रांजली कोरे, तृतीय अहिल्यानगर रिद्धी महाडिक, गार्गी देशमुख, कोमल दौंड या खेळाडूंनी स्पर्धेत अंतिम दिवशी वर्चस्व सिद्ध केले आहे. या तीन दिवसीय स्पर्धे मध्ये सर्वसाधारण विजेतेपद मुलांमध्ये पुणे- प्रथम, नाशिक- द्वितीय, छत्रपती संभाजीनगर- तृतीय व मुली मध्ये छत्रपती संभाजी नगर- प्रथम, सातारा-द्वितीय, कोल्हापूर-तृतीय यामध्ये पंच म्हणून स्पर्धा प्रमुख आनंद वाघमारे मुंबई, केदार ढवळे, पेरिया स्वामी, तुषार आहेर ,अभिषेक दुधाने, सौरभ तोमर, राहुल माडवरकर, प्रफुल जगताप, धीरज माने, मोहसीन शेख, वझरुद्दीन काजी, विशाल पवार,पवन भोसले, देवाशिष वाडीले, भुनेश नागोसे, अजय त्रिभुवन, प्रसाद परदेशी, विशाल दानवे, बाबुराव जाधव यांनी काम बघितले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे सचिव संजय भुमरे, सहसचिव नरेंद्र रायलवार, राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ, अनिल कदम, डॉ.आनंद भट्ट, सुशिल इंगोले, प्रसिद्धी प्रमुख गोपालराव सरनायक यांच्या सह जिल्हा फेल्सिंग संघटनेच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.