Gadchiroli :- ट्रकमध्ये कोंबुन कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या ७० गोवंशांना जीवनदान देण्यात आ.डॉ. मिलींद नरोटे यांच्या समयसुचकतेने यश प्राप्त झाल्याची घटना काल ९ सप्टेंबर रोजी चातगांव येथे घडली.
७० गोवंशांना जीवनदान
धानोरा येथून चातगावकडे अशोक लेलँड(Ashok Leyland) कंपनीचा ट्रक जात असल्याचे आ.डॉ. मिलींद नरोटे यांच्या निदर्शनास आले. त्यांना शंका आल्याने धानोरा येथील बाजार चौकात बसलेल्या कार्यकर्त्याकडे चौकशी केली. ही शंका खरी ठरल्याने ट्रकचा पाठलाग केला. मात्र धानोरा येथे ट्रकला अटकाव करण्यात यश आले नाही. या संदर्भात आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (police officer) तसेच सबंधित अधिकार्यांना सुचना दिली. चातगाव येथे नाकाबंदी (Blockade) करण्यात आली. पोलिसांनी चातगांव येथे ट्रक थांबविला असता ट्रकचालक व सहकारी पळून केले. परंतु एका जणास ताब्यात घेण्यात आहे.
या ट्रकमधून ७० जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे दिसुन आले. ही कारवाई प्राणी कल्याण अधिकारी राम नंदनवार, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास चातगांव पोलीस करीत आहेत.