चालू गाळप हंगामात १,०२११० मेट्रिक टन उसाचे गाळप
लातूर (Jagruti Sugar) : राज्यात खाजगी साखर उद्योगात भरारी घेणाऱ्या व एफ आर पी पेक्षा अधिक भाव उस उत्पादक शेतकऱ्यांना देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड आलाईंड इंडस्ट्रीज यांच्या वतीने चालु हंगामात गाळपास आलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती मेट्रिक टन २७००/ रुपयाप्रमाने उस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी ९ डिसेंबर रोजी उस बिल जमा करण्यात येणार असल्याची माहिती जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी दिली आहे.
जागृती शुगर चे सर्व गाळप यशस्वी
जागृती शेतकऱ्यांची प्रगती या ब्रीदवाक्या प्रमाणे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कारखान्याने एफ आर पी पेक्षा अधिक भाव देत शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम केले असुन जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजने पहिल्या गाळप हंगामापासून शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला असून आतापर्यंत सर्व १३ गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडले असून २०२४ – २५ चालु गाळप हंगामात कारखान्याने आजतागायत २१ दिवसात १,०२११० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून ९३,२०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे सरासरी रीकव्हरी १०.९० असून कारखान्याकडून ३,३४४२०० विज महामंडळाला निर्यात केली आहे चालु गाळप हंगामात उस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी उसबिल खात्यावर जमा होणार असून कारखान्याकडून जास्तीत जास्त भाव देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी दिली.
उस उत्पादक शेतकऱ्यांनी उस आपल्या कारखान्यास द्यावा
चालु गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून प्रशासनाने गाळप करण्यासाठीं जय्यत तयारी सुरू असून उस तोड वेळेवर होईल यासाठी आवश्यक प्रयत्न कारखाना प्रशासनाकडून करण्यात आला आहे आपला उस आपल्या साखर कारखान्यास द्यावा असे आवाहन जागृती शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी केले आहे.