जिंतूर तालुक्यातील भोगाव येथील घटना अकस्मात मृत्युची नोंद!
परभणी (Suicide Case) : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना 18 जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात (Jintur Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी त्यांनी जिंतूर पोलिसात खबर!
सुदाम पुंजारे यांनी खबर दिली आहे. वर्षा एकनाथ शेवाळे वय 26 वर्ष, असे मयत विवाहितेचे नाव आहे. 18 जुलै रोजी गावातील लोक मारोती शेवाळे यांच्या विहिरीजवळ जमा झाले होते. त्या ठिकाणी पोलीस पाटील सुदाम पुंजारे यांनी माहिती घेतली असता, त्यांना गावातील एकनाथ शेवाळे यांच्या पत्नी वर्षा यांनी विहिरीत स्वत:हून उडी घेऊन आत्महत्या केली आहे, असे समजले. या प्रकरणी त्यांनी जिंतूर पोलिसात खबर दिली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक मेहेत्रे यांनी भेट देवून पाहणी केली. अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
उपचारा दरम्यान इसमाचा मृत्यू!
परभणी : ह्रदय विकाराच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या चाळीस वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना 18 जुलै रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास परभणी येथील शासकीय रुग्णालय परिसरात घडली. महेश आश्रोबा शिंदे असे मयताचे नाव आहे. सपोउपनि. एच.एच. नैताम यांच्या खबरीवरुन कोतवाली पोलिसात (Kotwali Police) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. अनंतपुरे करत आहेत.