कन्हान (International Yoga Day) : शहरातील तारसा रोड येथिल कुष्णराव लॉन येथे सुख-शांती- समाधान संस्था शाखा कन्हान व्दारे भव्य आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) थाटात साजरा कर ण्यात आला. योग दिनाच्या कार्यक्रमाचा कन्हान शहरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहुन लाभ घेतला.
शनिवार (दि.२१) जुन २०२५ ला आंतरराष्ट्रीय योग दिना (International Yoga Day) निमित्य कुष्णराव लॉन येथे सुख, शांती, समाधान संस्था शाखा कन्हान व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करून पहाटे सकाळी ५.३० वाजता प्रमुख अतिथी मा.संजयजी गोयल सर, मा. रामदासजी पोपळकर, मा. शैलेंद्र गेडाम (पंतजली योग पिट), मा. घारपिंडे बाबा आदी च्या हस्ते दीप प्रज्वलित करून प्राथना, संधी संचालन व स्वागत गित गायत्री मंत्राने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. योगा नुत्य योगासन आणि अनुभवाचा सराव सुंदर पध्दतीने करण्यात आला.
नियमित पहाटे सकाळी ५.३० ते सकाळी ७ वाजे पर्यंत योगा अभ्यास केल्याने बी पी, सुगर, गुडघे दुखी, गॅस, पोटदुखी, तणाव, चिडचिडपन आणि आणि इतर आजार सुध्दा बरे होऊन आरोग्य चांगले झाल्याचे नियमित योग करणा-या नागरिकांनी आपले अनुभव व्यकत केले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिला पुरूष नागरिकाना योग अभ्यास लाभा विषयी मार्गदर्शन केले. सुख-शांती- समाधान संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिनजी माथुरकर सर यांनी मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (International Yoga Day) शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते नियमित योग अभ्यास करणा-याना योग पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच कार्यक्रमास उपस्थित २५० नागरिकांना योग चार्ट वाटप करून आंतरराष्ट्रीय योग दिन थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मिलींद पोपळकर, ओमप्रकाश (महेश) काकडे, जितेंद्र चौधरी, शेखर ठवकर, शांताराम जळते सर, संदीप माहुलकर, राजा संभोजी, पंकज रामटेके, लताताई जळते मॅडम, मुक्ताताई ठाकरे, संगिताताई नाटकर, आशााई भोमले, रिनाताई चौबे, मालतीताई पोपळकर, मिनाताई रामटेके, मिनाताई कुंभलकर, प्रमिलाताई वहीकर आदी सह नियमित योग करण्या-या महिला, पुरूषानी सहकार्य केले.