परिवारातर्फे संशय व्यक्त!
पुसद (Suspicious Dead Body) : शहर पो स्टे अंतर्गत कोपरा येथील एका 45 वर्षीय महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. शबाना बी शे. अनिस पटेल रा कोपरा ही महिला सायंकाळी शेतातून परत न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेणे सुरु केले. दरम्यान बराच शोध घेऊनही ती सापडली नाही. काही वेळाने पुन्हा शोध सुरु केला असता शेताजवळील ओढ्या काठावर शबाना बी चा मृतदेह आढळून आला. पहिल्या वेळी याच ठिकाणी शोध घेण्यात आला होता त्या वेळी तिथे मृतदेह नव्हता मात्र 1 ते दीड तासाच्या फरकाने त्याच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने परिवारातर्फे संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकारणी तूर्त आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली असून, सर्प दंश झाल्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे ठाणेदार (Thanedar) सेवानंद वानखडे यांनी सांगितले.