अभिनेता जितू वर्मा रॅलीचे प्रमुख आकर्षण
रिसोड (Swachhata Rally Abhiyan) : ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन (Mamta and Madhusudan Agarwal Foundation) व रिसोड नगरपरिषद रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेतून रिसोड शहरामध्ये बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता रॅलीचे आयोजन (Swachhata Rally Abhiyan) करण्यात आले होते. सदर रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता जितू वर्मा हे होते. जे रॅलीमध्ये घोड्यावर स्वार होऊन स्वच्छतेचा संदेश देत होते.
स्थानिक नगर परिषद कार्यालय येथून सुरुवात झालेली ही रॅली डॉक्टर आंबेडकर चौक, नवीन सराफा लाइन, चांदणी चौक, जुनी सराफा लाईन, अष्टभुजादेवी चौक,जामा मस्जिद चौक, आसन गल्ली, ने होत छत्रपती शिवाजी महाराज येथे सदर रॅलीचे समापन झाले. रैली ने विविध मार्गांनी फिरून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरली. विद्यार्थ्यांनी हातात फलक, बॅनर आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून (Swachhata Rally Abhiyan) “स्वच्छ शहर – आपली जबाबदारी” असा संदेश दिला रॅलीत शिक्षक, विद्यार्थी, नगरसेवक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
रॅलीच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनीही उत्साहाने रॅलीचे स्वागत केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. “स्वच्छता ही केवळ मोहिम नसून प्रत्येकाची सवय झाली पाहिजे.” त्यांनी नागरिकांना नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. या रॅलीमुळे रिसोड शहरात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, पुढील काळात अधिक उपक्रम राबविण्याची माहिती देण्यात आली.
या (Swachhata Rally Abhiyan) रॅलीमुळे शहरात स्वच्छतेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना दृढ झा ली. रॅलीत ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचे अध्यक्ष मधुसूदनजी अग्रवाल, रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, रिसोडचे ठाणेदार चव्हाण साहेब, प्रसिद्ध चित्रपट कलाकार जितू वर्मा, शहरातील नागरिक,पत्रकार, व्यापारी मंडळी, नगरपरिषद कर्मचारी व वारकरी दिंडी तसेच अप्पास्वामी व्यायाम मंडळाच्या मुलींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.रॅली पूर्वी रिसोड नगरपरिषद प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मधुसूदन अग्रवाल, प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा, ठाणेदार रामेश्वर चव्हाण, प्रसिद्ध चित्रपट कलाकार जितू वर्मा, माजी नगराध्यक्षा विजयमाला आसनकर, उत्तमचंद बगडिया हे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये मुख्याधिकारी सतिश शेवदा यांनी १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून (Swachhata Rally Abhiyan) स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून 2 ऑक्टोबर पर्यंत च्या विशेष अभियानाची माहिती दिली.
तसेच स्वच्छता मोहिमेमध्ये (Swachhata Rally Abhiyan) ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन (Mamta and Madhusudan Agarwal Foundation) तर्फे केल्या जाणाऱ्या सहकार्याचे आभार व्यक्त केले. ठाणेदार चव्हाण यांनी नागरिकांनी स्वच्छतेबाबत शिस्त पालन करण्याची आवश्यकता व्यक्त केली तर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी नागरिकांसोबत विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय जीवनामध्येच स्वच्छतेचे धडे द्यायला पाहिजे जेणेकरून स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या घराचा गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा व पर्यायाने देशाचा विकास होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. चित्रपट कलाकार जितू वर्मा यांनी गावाच्या स्वच्छते सोबतच आपल्या विचारांची स्वच्छता सुद्धा करणे गरजेची असल्याचे सांगितले सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मधुसूदन अग्रवाल यांनी रिसोड हे आपले मूळ गाव असून ते स्वच्छ सुंदर असावे याकरिता सर्वतोपरी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
स्वच्छतेबाबत नगरपरिषदेसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार आपल्या रिसोड शहराला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली व त्यासाठी लागणारे आर्थिक तसेच इतर सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले. या स्वच्छता मोहिमेसाठी फाउंडेशन करीत असलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली तसेच हा स्वच्छता उपक्रम केवळ पंधरा दिवस नव्हे तर नेहमीसाठी रिसोड नगर परिषदे सोबत राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता रॅलीच्या यशस्वी ते करिता रिसोड नगर परिषद स्वच्छता विभाग, ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन ची संपूर्ण टीम यांनी परिश्रम घेतले.