ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांचे प्रतिपादन
लातूर (Swami Vivekananda) : विवेकानंदांनी मानसिक दौर्बल्य, नशीब यांना थारा दिला नाही. समर्थ व्हा, संघटित व्हा, घाबरू नका, समाजसेवा करा हे तत्व त्यांनी शिकवले. हिंदुत्वात हिंसेला स्थान नाही, हे सांगणारे विवेकानंदांचे हिंदुत्व होते, असे प्रतिपादन सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी केले. अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील दयानंद सभागृहात (Swami Vivekananda) विवेकानंदांचे हिंदुत्व या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजिका मृणाल कुलकर्णी होत्या.
विषय स्पष्ट करताना विवेक घळसासी म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात हिंदुत्व हे अशास्त्रीय व कालबाह्य असल्याचा दुष्प्रचार केला गेला. डाव्या समाजवाद्यांनी या कारस्थानाला पाठबळ दिले. हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं आहे, असे सांगितले गेले. पण तो हिंदुत्वातील आत्मोन्नतीचा धार्मिक मार्ग आहे. राजकीय अभिव्यक्ती हा हिंदुत्वातील आणखी एक स्तर आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंदुत्व समजून घेण्यासाठी ठसठशीत बुद्धिवादाची आवश्यकता असते. आत्मोन्नती सोबतच विश्वोन्नती हा हिंदुत्वाचा आयाम आहे. (Swami Vivekananda) स्वामी विवेकानंदांनी हा विचार आत्मसात करून आयुष्यभर त्याचा वापर केला.
स्वामी विवेकानंदांनी (Swami Vivekananda) ईश्वरी तत्वाचा शोध घेताना जगातील इतर धर्माच्या धार्मिक साहित्याचा भाबडेपणा उघड केला. हिंदुत्वाने कधीही एकट्याच्या कल्याणाचा विचार केला नाही. प्रेम हा हिंदुत्वाचा ब्रम्हांडव्यापी अविष्कार आहे. हिंदुत्व म्हणजे विश्व कल्याणाचे चिंतन आहे, असे विवेकानंदांचे विचार होते. अध्यक्षीय समारोप उद्योजिका मृणाल कुलकर्णी यांनी केला. प्रास्ताविक सचिव प्रदीप नणंदकर यांनी केले. संजय अयाचित यांनी आभार मानले.
हिंदुत्वाच्या प्रसारासाठी अनुकूल काळ
आज नियतीने हिंदुत्ववादी विचारांच्या प्रसारासाठी अनुकूल काळ निर्माण केला आहे. त्याचा योग्य वापर करत जात-पात, भाषा व प्रांताचे भेद मानू नका. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा आग्रह धरा. स्वधर्म, स्वदेशीचा आग्रह धरा, असे आवाहनही घळसासी यांनी केले.