जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते”स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान आरोग्य शिबिराचे उद्घघाटन
हिंगोली (Mission Health Camp) : शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मस्तानशहा नगर येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान आरोग्य शिबिराचे उद्घघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिरात महिलांना 20 आरोग्य सेवा (Mission Health Camp) देऊन यात एकून 107 महिलांची तपासणी करण्यात आली.
यावेळी (Mission Health Camp) सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, अभियान नोडल अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी मारोतराव पोले,वैद्यकिय अधिकारी डॉ. पुंडगे, डॉ साक्षी मारकड डॉ शेख आतिफ डॉ रणजीत मस्के, रामेश्वर रोडे ,हर्ष मनोहर ,शैलेश मुदडा, नाक्षण भालेराव ,शेख अनवर, रवींद्र भालेराव ,प्रदीप आंधळे ,पंजाब गायकवाड ,मारुती सोलापूर ,सय्यद इब्राहम , प्रसाद कुलकर्णी ,दीपक पवार विशाल लोखंडे गणेश ठोके राहुल राठोड ,प्रियंका राठोड, सुनीता सुपलकर,शितल सानप, निहा अमरावतीकर, सुनिता इंगोले, श्रीमती मोरे मॅडम, पांडुरंग खुडे शुभम ढवळे विजय ठोक सचिन इंगोले व आशाताई सर्व कर्मचारी उपस्थित होते.