Ner :- येथील झाडीपुरा येथील एका नगरपरिषद सफाई कामगाराचा जळगाव येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल घडली. मारुती मधुकर कडुकार (४३) असे या सफाई कामगारांचे नाव आहे. सफाई कामगाराच्या एका आंदोलनाला नेर नगर परिषदेमधील (City Council) सात ते आठ कर्मचारी जात होते. दरम्यान मारुती कडुकार यांचा जळगाव जवळ तोल गेल्याने ते रेल्वे खाली कोसळले त्यांचा चिरडून मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी भाऊ असा परिवार आहे.
पूर्ववैमनस्यातून एकावर काठीहल्ला
Yawatmal :- पूर्व वैमनस्यातून एकास काठीने मारहाण (beating)केली. ही घटना ३ ऑगस्ट रोजी तिवसा येथे घडली, विजय दादाराव जाधव (१८) रा. तिवसा असे जखमीचे नाव आहे. त्यांच्याशी जुन्या भांडणाचा वाद निर्माण करून संतोष शंकर आडे याने शिवीगाळ (Abusing) केली, तसेच लाकडी काठीने त्यांच्या हातावर मारून जखमी केले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाची तक्रार विजय जाधव याने लाडखेड पोलिसांत केली. यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.