बाळापूर (Mokha Deputy Sarpanch) : तालुक्यातील मोखा येथील उपसरपंच रेखा बागडे यांच्याविरूध्द सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव २८ फेब्रुवारी रोजी ६ विरूध्द १ अशा मताधिक्याने पारित झाला तर एका सदस्याने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
मोखा येथील उपसरपंच रेखा बागडे (Mokha Deputy Sarpanch) यांच्याविरूध्द २४ फेब्रुवारी रोजी ग्रा.पं. सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव तहसीलदार बाळापूर यांचेकडे दाखल केला होता. त्यावर अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आवश्यक ती सूचना देऊन २८ फेब्रुवारी रोजी तहसीलदार वैभव फरतारे यांचे उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला ८ सदस्य उपस्थित होते.
त्यापैकी ६ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाचे बाजूने हात वर करून मतदान केल्यामुळे (Mokha Deputy Sarpanch) उपसरपंच रेखा बागडे यांचे विरूध्दचा अविश्वास प्रस्ताव ६ विरूध्द १ अशा मताधिक्याने पारित झाला. अविश्वाच्या बाजूने मयूरी खरप सरपंच, नंदा बागडे, मोनीका गावंडे, हरीभाऊ तायडे, दिपक हिवराळे, गोकूळा तायडे यांनी मतदान केले तर उपसरपंच रेखा बागडे यांनी अविश्वास प्रस्तावाचे विरोधात मतदान केले. तर वनिता काळे यांनी तटस्थ राहणे पसंत केले. सभेचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार वैभव फरतारे उपस्थित होते. ग्रामविकास अधिकार्यांनी त्यांना सहकार्य केले.