Parbhani robbery :- परभणीतील पालम तालुक्यातील कापसी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळून १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २७ जुलैच्या रात्री १०.३० ते २८ जुलैच्या पहाटे ३ या दरम्यान घडली. सदर प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालम तालुक्यातील कापसी येथील घटना अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
नामदेव जाधव यांनी तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचे चॅनल गेटचे व दाराचे कुलूप तोाडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्या -चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केली. सोन्याच्या अंगठ्या, पाटल्या, सोन्याचे नेकलेस(Gold necklace), गंठण, कानातील झुंबर, जोडवे, सोन्याचे लॉकेट व इतर चांदीचे दागिने तसेच रोख २ लाख १२ हजार रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनास्थळी ठसे पथक, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील यांनी भेट दिली. प्रकरणाचा तपास सपोनि. खटाणे करत आहेत.