राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (TB Free Gram Panchayat) : जागतिक क्षयरोग दिना निमित्त दिनांक २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात टीबी मुक्त ग्राम पंचायत अभियाना अंतर्गत टीबी मुक्त ग्राम पंचायतींना (TB Free Gram Panchayat) प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग फोफसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजीत बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ काळे, डॉ जोगदंड, डॉ चव्हाण, डॉ कत्रुवार, डॉ गारोळे, डॉ बालाजी भाकरे, आयएमएचे सचिव डॉ राम मुंढे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत पोटेबल एस्करे मशीनचे लोकार्पन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी उपस्थित सर्व (TB Free Gram Panchayat) ग्राम पंचायतचे प्रतिनिधी यांना टीबी मुक्त ग्राम पंचायत कार्यक्रमामध्ये यावत्रीही सातत्य ठेऊन मागील वर्षा प्रमाणे पुरस्कारासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चक्रधर मुंगल यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यानंतरच (TB Free Gram Panchayat) जिल्हा टीबी मुक्त होण्यासाठी वाटचाल करता येईल. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस यांनी टीबी मुक्त ग्राम पंचायत प्रभावी करण्यासाठी गाव पातळी पर्यंत प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे विशद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ देवेंद्र जायभाये यांनी सांगितले की, हिंगोली जिल्हा टीबी मुक्त करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले. यावेळी आशा, आरोग्य कर्मचारी, आरोग्य संस्था यांनी सहकार्य केले. येत्या दोन तीन वर्षात आपला (TB Free Gram Panchayat) हिंगोली जिल्हा टीबी मुक्त जिल्हा म्हणून घोषीत झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करुन जास्तीत जास्त संशयीत क्षयरुग्ण शोधुन तपासणी करावी व टीबी आजाराचे तात्काळ निदान करावे त्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्रा मार्फत मोफत धुंकी तपासणी तसेच एक्सरे तपासणी केली जाते याचा जास्तीत जास्त नागरीकांना फायदा होईल त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत व आपला हिंगोली जिल्हा टीबी मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रौप्य पदक प्राप्त औंढा तालुका ६, वसमत तालुका ९. हिंगोली तालुका ४. कळमनुरी तालुका ५. सेनगाव तालुका १० अशा एकूण ३४ ग्राम पंचायतींना रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन सरपंच, आशा, आरोग्य कर्मचारी यांना सन्मानीत करण्यात आले. याच कार्यक्रमात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारी आरोग्य संस्था म्हणून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली व प्रा. आ. केंद्र आ.बाळापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश कत्रुवार यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्यकरणारे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी उबाळे यांनी केले. शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीनी स्वागत गीत सादर केले. (TB Free Gram Panchayat) कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




