शिक्षकाने केला विश्वरत्न डॉ आंबेडकर व बौद्ध धर्माचा अपमान!
मानोरा (Teacher Crime) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोजे कोलार येथील वामन बाबा कन्या विद्यालयात दि. २३ सप्टेंबर रोजी इयत्ता ७ च्या वर्गावर इतिहास विषय शिकविताना शिक्षक मंगेश रामराव ठाकरे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धर्माचा अपमान एका विद्यार्थिनी समोर केला होता . सदरील प्रकरणी आंबेडकरी आंदोलकांनी पोलीस स्टेशनवर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने तब्बल तीन दिवसानंतर त्या आरोपी शिक्षकाविरुद्ध विद्यार्थिनी कु. अवंतिका मिलिंद कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह विविध कलमांनावे गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.
वामन बाबा कन्या शाळेतील प्रकार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी शिक्षक हे गौतम बुद्ध भाग शिकवताना फिर्यादी विद्यार्थींला जात विचारली. व तुमच्या जातीमध्ये चोरी मास खायला मना आहे, तुम्ही त्याचे पालन करता का? त्यावर आम्ही चोरी करत नाही मास सर्व खातात. तुमच्या जातीच्या बाया पांढऱ्या साड्या घालतात लिपिस्टिक लावतात व नाचतात. नवरा दुसऱ्या दिवशी दारू पिवून नाचतात. त्यानंतर धडा शिकविणे बंद करून सांगितले की तुमचा गौतम गरीब नव्हता श्रीमंत होता, असे मैत्रिणींने सांगितले. दुपारून नागरिक शिवताना आरोपी ठाकरे संविधान विषयावर पाठ शिकवताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आल्यावर भिम्याने काय केले, संविधान लिहून मुका बसला. यावर शिक्षकाला सांगितले असता मुकी राहण्याचा सल्ला दिला. तसेच बुध्द व बुध्दाच्या पोरी पण तशाच आहेत. तुम्ही मास खायचे कामी आहे. त्यावर जाती वाचक बोलू नका सदर बाब घरी सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी शाळेत पालक वर्ग बौद्ध समाज बांधवांनी एकत्रित येऊन त्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलनाच्या धडाक्याने तीन दिवसानंतर गुन्हा दाखल!
सदर बाब मुख्याध्यापक यांच्याकडे चौकशी करण्याची विनंती केली शिक्षक शाळेत नाही. यावेळी शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. परंतु डॉ बाबासाहेब यांच्या संविधानाचा व इतर महापुरुषांचा फोटो नाही. यावर मुख्याध्यापकांनी सांगितले की, आम्हाला २५ ते ३० फोटो लावावे लागेल. असे तीन ते चार वेळा सांगितले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा चोळामोळा करून कोपऱ्यात दिसल्या. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे संघमित्रा महीला मंडळाच्या महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Complaint Filed) केल. मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबरला शिक्षक शिक्षक मंगेश रामराव ठाकरे या शिक्षकांनी इतिहास विषय शिकवीत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी काय केले, असे अपमान व जाती वाचक शिवीगाळ केल्याबद्दल आरोपी शिक्षक ठाकरे विरुध्द कलम (बी एन एस) २०२३ कलम २९९ , बी एन एस २०२३ कलम ३०२, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) आदी नियम १९८९ ३ ( १ ), (आर ) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ ३ ( १ ) ( एस ) अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा करीत आहे.