देशोन्नती वृतसंकलन
माहूर (Teacher Death Case) : तालुक्यात अठवड्या पासून ढगाळ वातावरण होते दि १५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस कोसळत असताना शिक्षक संजय कृष्णकुमार पांडे हे माहुर वरून करंजी त्यांच्या गावाकडे मालवाडा घाटातुन दुचाकी क्रं एम एच २९ बि एस ४६८१ ने जात असता (Teacher Death Case) विज कडकडून चालत्या दुचाकी वर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तालुक्यात गत आठवड्यापासून वातावरणात बदल झाला असुन अधुन मधुन भाग बदलत पाऊस कधी वारा तर कधी विजांच्या कडकडाटात होता दि १५ रोजी दुपारी अचानक अडीच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. (Teacher Death Case) विदर्भातील मौजे हिवरा येथे जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक ते तालुक्यातील मौजे कंरजी येथिल रहीवाशी असल्याने ते पाऊस सुरू असताना मालवडा घाटातुन जात असताना लांजी बाय पास नजिक असताना त्यांच्या चालत्या दुचाकीवर विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक शिवप्रकास मुळे, पि एस आय संदिप आनेबोइनवाड यांनी घटनास्थळ गाठुन (Teacher Death Case) मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणला असता, तेथे वैद्यकीय अधिक्षक किरण कुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी विपिन बाभळे सहकारी परमेश्वर जुडे यांनी शवविच्छेदन केले तर, दुसर्या घटनेत असोली येथील अमरसिंह रामजी चव्हाण हे शेतात बैल चारत असताना जवळच विज कोसळल्याने ते जखमी झाले त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.




