Ralegaon :- पांढरकवडा वनविभागाचे फिरते पथक वडकी परिसरात गस्तीवर असताना सागवान उतरविण्याच्या तयारीत असलेल्या भारत ट्रान्सपोर्टचे वाहन वनविभागाने (Forest Department) तपासणीच्या नावाखाली ताब्यात घेतले. हि कारवाई ४ सप्टेंबरच्या सायंकाळी सात वाजता दरम्यान येथील गजानन प्लायवूड या दुकानाजवळ करण्यात आली.
संशयित वाहन पांढरकवडा वनविभागाच्या ताब्यात
पांढरकवडा वन विभागाचे फिरत पथक वडकी परीसरात दिवसभरच गस्तीवर होते. नागपूर येथील भारत गुड्स गॅरेजचे एम.एच.३१ सी.बी.५०७५ या क्रमांकाचे वाहन वडकी येथील गजानन प्लायवूड या दुकानाजवळ सागवान उतरविण्याच्या बेतात असतांना अचानक वनविभागाने धाड टाकून ते वाहन ताब्यात घेतले. दरम्यान वनविभागाने वाहनांमध्ये असलेल्या लाकडाबाबत टिपी तथा अधिक चौकशी केली असता ते लाकडे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. परीणामी सदर वाहन पांढरकवडा येथील वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे वन विभागाचे पथक आज दिवसभर वडकीत ठाण मांडून होते अन् सदर वाहन देखील दुपारपासूनच वडकी येथील विविध दुकानातील माल उतरवून शेवटी गजानन प्लायवूड या दुकानाजवळ आले असता अचानक वनविभागाने धाड टाकून कारवाई केली. त्यामुळे विविध चर्चेला उधाण आले आहे.