नवीन तंत्रज्ञानाने वेधले लक्ष; लाखो नागरिकांनी दिली भेट
परभणी (Agricultural festival) : संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने १४ ते १८ फेब्रुवारी या दरम्यान आयोजीत कृषी महोत्सवात १० कोटीची उलाढाल झाली आहे. पाच दिवसीय महोत्सवाला लाखो नागरीकांनी भेटी दिल्या. (Agricultural festival) कृषी महोत्सवातील नवीन तंत्रज्ञानाने सर्वांचे लक्ष वेधले.
परभणी येथील वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कृषी संजीवनी महोत्सव, प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये २४० स्टॉल उभारण्यात आले. या स्टॉलव्दारे विविध शासकीय योजना, कृषी तंत्रज्ञान, खते, बी – बियाणे आदींची माहिती शेतकर्यांना देण्यात आली. महिला बचतगटाच्या वतीनेही स्टॉल उभारण्यात आले होते .या (Agricultural festival) महोत्सवात सांगली, सातारा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातुर, कोल्हापुर, जालना, हिंगोली तसेच इतर जिल्ह्यातील शेतकर्यांनी भेटी दिल्या. महोत्सवात महिला बचतगटांनी गृहउपयोगी वस्तुंचे स्टॉल उभारले होते. कृषी महोत्सवात भेट देणारे नागरीक, शेतकरी यांना विविध विभागांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांची माहिती देण्यात आली.
शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान
कृषी महोत्सवात (Agricultural festival) शेती संबंधी स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय, निमशासकीय योजना, बी – बियाणे, खते, ड्रोन या विषयी शेतकर्यांना माहिती देण्यात आली. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्यासह इतर वस्तु (Agricultural festival) कृषी महोत्सवात पहावयास मिळाल्या. कृषी महोत्सवाचे नियोजन व आयोजन शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.