Ralegaon Accident :- राष्ट्रीय महामार्ग ४४ वर सोनुर्ली फाट्याजवळ एका टिप्पर व कंटेनर ची भीषण धडक झाली. यामध्ये टिप्पर चालक गंभीर जखमी झाला असून क्वीनर किरकोळ जखमी झाला आहे. हि घटना १ जुलै रोजी दुपारी एक वाजता दरम्यान घडली.
या अपघातातील टिप्पर इंजिनचा जोरदार स्फोट झाल्याचे यावेळी प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले
वडकी पोलीस ठाण्याअतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर सोनुर्ली फाट्याजवळ सावरखेड्या वरून एमएच ४० सी एम ८४६२ या क्रमांकाचा टिप्पर चुरी भरून येत होता यावेळी हैदराबाद कडून नागपूर कडे जाणार्या आर.जे.११ जे.डी.२०८४ या कंटेनरची व टिप्परची जोरदार धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले विशेष म्हणजे या अपघातातील (Accident) टिप्पर इंजिनचा जोरदार स्फोट झाल्याचे यावेळी प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या टिप्पर चालकाचे नाव अंकुश आसुटकर दहेगाव व क्वीनर चे नाव महेंद्र उईके वेडशी असे आहे. कंटेनर चालकाने घटना स्थळावरून पलायन केल्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिसांसह राष्ट्रीय महामार्गाचे देखभाल करणारे कर्मचारी घटना स्थळावर पोहोचले. त्यांनी अपघातातील अडकलेल्या जखमी चालकाला टिप्पर (Tipper) च्या बाहेर काडून रुग्णालयामध्ये नेले व टिप्पर रोड च्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.




 
			 
		

