अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाचा न्यायालयीन लढ्यासाठी पुढाकार
यवतमाळ (TET Review Petition) : सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयाने देशातील प्राथमिक शिक्षकांना (१ ली ते ८ वी) शिक्षक पात्रता परीक्षा(टीईटी) अनिवार्य करणारा निकाल दिला.त्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती आणि त्यामुळे देशभरातील लाखो शिक्षक प्रभावित झाले होते. (TET Review Petition) अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न असलेल्या शिक्षक संघटनेने शिक्षकांची भक्कमपणे बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे पुनर्विचार याचिका दाखल करून शिक्षकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाने (TET Review Petition) पंतप्रधान व केंद्रीय शिक्षण मंत्री यांना सर्व जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देऊन याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आणि सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे रिव्ह्यू पिटीशन दाखल करून प्रभावित झालेल्या शिक्षकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने २५ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे ‘रिव्ह्यू पिटीशन’ आर.पी(सी) क्र.५५९५७/२०२५ पुनर्विलोकन याचीका दाखल केली आहे.
याकरिता संघटनेच्या (TET Review Petition) वतीने माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी तसेच माजी सॉलिसिटर जनरल संतोष हेगडे हे ख्यातनाम वकील शिक्षकाची बाजू मांडणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर, राष्ट्रीय सचिव कमलाकांत त्रिपाठी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदास बसवदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, अण्णाजी आडे, सल्लागार सुरेश भावसार, विश्वनाथ सूर्यवंशी, प्रकाश दळवी, दिगंबर जगताप यांनी सांगितले.
शिक्षकांच्या व शिक्षणाच्या न्याय मागणी साठी, आपले हक्क अबादीत ठेवण्यासाठी संघटना कायम आपल्या सोबत आहे. तरी (TET Review Petition) शिक्षकांच्या अस्तीत्वाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप, यवतमाळ जिल्हाध्यक्ष किरण राठोड, जिल्हा सरचिटणीस सारंग भटुरकर आदी पदाधिकार्यांनी केली आहे.