Arni :- ऑगस्ट महिन्या पाठोपाठ सप्टेंबर महिन्यात सुद्धा अतिवृष्टीने (heavy rain) कहर केला. शेतकर्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शासनाने सुरुवातीला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र आर्णी तालुक्यात प्रशासनाच्या तहसील तसेच कुषी विभागाने बसल्या जागेवरून नुकसानग्रस्तांची बोळवण करीत केवळ ५० टक्के नुकसान झाले असल्याचे समोर करीत नुकतीच भरपाई रक्कम ५० टक्के वितरीत करीत असल्याचे समोर आले आहे.
आर्णी तालुक्यात शेतकर्यांवर अन्याय, पंचनामे न करता लावला अंदाज
सुरुवातीला हेक्टरी ८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्यानंतर नुकसान भरपाई मदतीत वाढ करुन हेक्टरी १८ हजार रुपये मदत मिळणार आहे. मात्र तालुक्यातील सुकळी शिवारातील शेतकर्यांना(Farmer) आता ५० टक्के नुकसान भरपाई दिली जात आहे . त्यामुळे शेंदुरसनी येथील शेतकरी रमाकांत कोल्हे यांनी खात्यात जमा झालेली ६ हजार ९०० रुपयांची मदत शासनाला परत केली आहे. कारण त्यांना हेक्टरी ८ हजार ५०० रुपयांच्या अर्धी म्हणजे हेक्टरी ४ हजार ५०० रुपये मदत दिली गेली. वास्तविक पाहता शेतकर्यांना ८ हजार ५०० रुपयांची मदत कमी झाली आहे. कारण नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे .