चंद्रपूर (Chandrapur) :- केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत (Cabinet meetings)हा मोठा निर्णय घेतला आहे. जनगणनेची घोषणा होताच चंद्रपूर शहरात विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकार्यांनी आज दि.३० एप्रिलला जनता महाविद्यालयाच्या मैदानात फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला
आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. स्वतंत्र भारतात १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती. तर २०११ साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनाच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती. अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जीवतोडे यांच्या नेतृत्वात एकच जल्लोष करण्यात आला.