Yawatmal :- लोहारा पोस्टेच्या डिबी पथकाने नेर येथील मोटार सायकल चोरट्याला २४ तासाच्या आत अटक करण्यात यश मिळवले आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना डी. बी. पथकाला वाघापूर परिसरात एक व्यक्ती मोटार सायकल घेवून संशयित फिरत आहे.अशा माहिती वरून वाघापूर परिसरात जाऊन नाग मंदिर जवळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेली मोटार सायकल क्र. एमएच२९ एन ३०५३ बाबत कसून चौकशी केली असता सदर मोटार सायकल पोलिस स्टेशन (police station) नेर येथील अप. न.४७७/२५ कलम ३०३ (२) भा. न्या. स.मधील चोरीची असल्याने पुढील कारवाईसाठी आरोपीला नेर पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, कुमार चिंता, अ.पो.अ. अशोक थोरात, उ.पो.अ. दिनेश बैसाने, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार स पो. नि. रोहित चौधरी सो, पो.हवा,संतोष आत्राम, पोना पवन चिरडे, पोशी प्रशांत राठोड,बबलू पठाण,उमेश प्रधान, नितीन गजभार या पथकाने पार पडली.




