परभणी (Parbhani) :- पाथरी बाजार समितीतील (Market Committee) अतिक्रमणाला विरोध करीत ते हटविण्यासाठीच्या ठरावातील सुचक म्हणून पुढाकार घेणारे उपसभापती शाम धर्मे यांनी टिनशेड प्रकरणाच्या आडून व्यापारी हिताचा कांगावा दाखवू नये असा पलटवार सभापती आनिलराव नखाते यांनी शुक्रवारी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
सभापती नखाते यांचा उपसभापती धर्मेंवर पलटवार
पाथरी कृऊबा समिती टिनशेड प्रकरणी उपसभापती शाम धर्मे यांनी सभापती नखाते यांची दुटप्पी भुमीका असे माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकद्वारे म्हटले होते . शुक्रवार २१ मार्च रोजी या संदर्भात देशोन्नती मध्ये वृत प्रकाशित झाले आहे .त्याला शुक्रवारी एक प्रसिध्दीपत्रक काढत सभापती अनिलराव नखाते यांनी प्रत्युत्तर दिले. यात ते म्हणाले आहेत की, ३१ मे २०२३ रोजी बाजार समितीतील अतिक्रमण हटविण्यासाठी घेतलेल्या ठराव क्रं २ चे सुचक म्हणून उपसभापती शाम धर्मे यांनी पुढाकार घेतला होता.त्यामुळे त्यांनी व्यापारी हिताचा पुळका दाखवणे हे निरर्थक आहे. याऊलट मी सभापती म्हणून व्यापारी बांधवांच्या अडचणी समजून घेऊन ध्येय धोरणानुसार सोडवण्यासाठी वेळोवेळी अनुकूलता दाखवली आहे.व्यापार वाढीस चालना मिळणे याशिवाय रस्ते, पार्किंग, वीज, पाणीपुरवठा, प्रशासकीय ईमारत, अनावश्यक कराचा बोजा पडू नये अशा व्यापारी बांधवांना पायाभूत सविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला हि बाब व्यापारी व शहरवासीयांना माहिती असल्याची स्वतः बाजु मांडली आहे .
आँक्टोबर २०२२ रोजी टिनशेड बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार
व्यापारी, सरकार आणि प्रशासन यांचा दुवा म्हणून सभापती पदाला न्याय देण्याची माझी भुमीका कायम असल्याचे ह म्हणत भाजप किसान मोर्चाचे (BJP Kisan Morcha) जिल्हाध्यक्ष उध्दव नाईक यांनी २७ आँक्टोबर २०२२ रोजी टिनशेड बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार दिली . कोरोना महामारीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कापुस खरेदी मार्केट यार्डातच करावी असे निर्देश दिले होते. त्या परिस्थितीत वेळोवेळी आलेल्या परिपत्रकानुसार व्यापारी व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना कापुस खरेदीसाठी तात्पुरते स्वरूपात मोकळी जागा देण्याचा निर्णय आम्ही घेतला असा खुलासा सभापती म्हणून केला होता असे म्हटले आहे. या प्रकरणात ६ आँक्टोबर २०२३ रोजी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी अधिनियम १९६३ चे कलम ४० ई नुसार ३० दिवसात टिनशेड बांधकाम पाडण्याचे निर्देश बाजार समीती ला दिले होते. सरकार विभागाची जबादारी आणि निर्देशाचे पालन करीत असतांना दिवानी न्यायालय पाथरी, विभागीय सह निबंधक छत्रपती संभाजी नगर येथील याचीके संदर्भात न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे १८ मार्च रोजी २५ उपोषणकर्ते व्यापारी बांधवांसोबत चर्चेच्या वेळी मी सांगितले होते.
यावेळी सहाय्यक निबंधक संदीप तायडे,बाजार समिती संचालक अशोकराव गिराम, अशोकराव आरबाड,गणेशराव दुगाणे,रामप्रसाद कोल्हे यांचीही उपस्थिती होती असा संदर्भ त्यांनी दिला आहे .
न्यायालयाच्या (Courts) आदेशाच्या अधिन राहुन व्यापारी यांचे उपोषण सोडण्यासाठी सहाय्यक निबंधक संदिप तायडे यांनी सभापती म्हणून मला सोबत चला अशी विनंती केली.त्यानंतर आम्ही सोबत जाऊन व्यापारी बांधवांचे उपोषण सोडले अशी वस्तुस्थिती असतांना याबद्दल कुठल्याही प्रकारची माहीती नसणारे उपसभापती शाम धर्मे हे प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिशाभूल करून व्यापाऱ्यांप्रती सहानुभूतीचा कांगावा दाखवीत आहेत तो निरर्थक आहे असा आरोप सभापती अनिलराव नखाते यांनी केला आहे.



 
		

