हिंगोली (E-pos Machine) : जिल्ह्यातील १९० स्वस्त धान्य दुकानावरील जुलैचा इ पॉस मशीन वरील डाटा न आल्याने लाभार्थ्यांना तांदुळ कसा वाटप करावा असा पेच प्रसंग स्वस्त धान्य विक्रेत्यांना पडला आहे. त्यातच विशेष म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या घोळात हा डाटा अडकला असल्याचे सुत्रांकडून समजते. (E-pos Machine) स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला धान्य वाटप केले जाते. जुलै महिन्यामध्ये स्वस्त धान्य दुकानावर तांदुळ उपलब्ध झाले नव्हते.
या संदर्भात राशन विक्रेत्यांनी पुरवठा विभागाकडे पाठ पुरावा केल्यानंतर ३१ जुलैला जुलै महिन्याचा तांदुळ उपलब्ध झाला. एकीकडे तांदुळ उपलब्ध झाला असताना दुसरीकडे मात्र तब्बल मात्र ई पॉस मशीन बंद राहीली. त्यातच डाटाही आला परंतु तो ऑगस्ट महिन्याचा. जुलैचा डाटाच आला नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील तब्बल १९० राशन दुकानावरील तांदुळ वाटपाचे काम ठप्प झाले. या (E-pos Machine) संदर्भात राशन दुकानदार संघटनेच्या वतीने प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांच्याकडे जुलै महिन्याचा डाटा उपलब्ध करून द्यावा यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर राशन दुकानदार संघटनेतर्फे कक्षाधिकारी गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता हा विषय केंद्र शासनाच्या अख्त्यारित असल्याने त्यांच्याकडून डाटा उपलब्ध झाल्यानंतर तो आपणास उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.
विशेष म्हणजे ८ ऑगस्टला जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अव्वर सचिवांना एका पत्राव्दारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत अत्योंदय योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचा अनुदेय लाभ ई पॉस मशीनव्दारे पात्र लाभार्थ्यांना वितरीत, वाटप करण्या करीता जुलै व ऑगस्ट या कालावधीसाठी इ पॉस मशीनला पॉलिसीनुसार मुदतवाढ देण्याची मागणी केली. जिल्ह्यासाठी जुलै कालावधीची धान्य भंडारा जिल्ह्यातून उचल करणे बाकी असुन रास्त दुकानापर्यंत तांदुळ पोहच करणे सुरू आहे.
जुलै महिन्याचे धान्य ऑनलाईन (E-pos Machine) इ पॉस मशीनवर डाटा उपलब्ध नसल्याने वितरण करणे शिल्लक राहीले आहे. त्यामुळे जुलै या कालावधीच्या धान्यापासुन पात्र लाभार्थी वंचित राहू शकतात. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याच्या अन्नधान्यासाठी पात्र असणार्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, या करीता सर्व्हर इ पॉस मशीन संथ गतीने चालणे आदी बाबी विचारात घेऊन इ पॉस मशीनला ८ दिवसाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.