भंडारा (Bhandara):- मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या महत्त्वाच्या गरजेसह मोबाइल(Mobile), टीव्ही, केबल या महत्त्वाच्या गरजा झाल्या आहेत. ग्रामीणांपासून शहरी भागातील नागरिकांचे ते महत्त्वाचे साधन बनले. परंतु, ट्राईने मनोरंजनाचे साधन केबल, टीव्ही चॅनलवर करडी नजर ठेवून त्यांना मुक्त न ठेवता आवडीनुसार चॅनेल पाहण्याकरिता दर ठरवून दिले आहे. त्यामुळे हे पॅकेज महिन्याकाठी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी झपाट्याने टीव्ही, केबल बंद केल्याचा प्रकार समोर येत आहे.
दराचे दुप्पट दाम मोजावे लागत असल्याने टीव्ही केबलची संख्या दरदिवशी कमी
केबलधारकांना महिन्याला पॅकेजचे दर ठरवून दिल्याने सर्व चॅनल (Channel) पाहता येत होते. नवीन दर ट्राईने ठरवून दिल्याने या दराचे दुप्पट दाम मोजावे लागत असल्याने टीव्ही केबलची संख्या दरदिवशी कमी होत चालली आहे. तसेच टीव्ही पॅकेजच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागात झपाट्याने टीव्ही बंद होत आहेत. सूचना व प्रसारण मंत्रालयाद्वारे (Central govt) १ फेब्रुवारी २०१९ पासून टीव्ही, केबल ग्राहकांना मनोरंजनाकरिता आवडीनुसार टीव्ही पाहण्यासाठी नवीन पॅकेज निवडीचा विकल्प दिला असून त्यानुसार ग्राहकांना दर महिन्याला पॅकेज विकत घ्यावे. लागणार आहे. हे पॅकेज सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. पॅकेज आर्थिक भुर्दंड वसविणारे आहे.
मुला मुलींना शिक्षण शिकवावे की, टीव्ही पॅकेज, केबल पॅकेज विकत घ्यायचे?
दर महिन्याला पॅकेज घेणे आवाक्याबाहेर आहे. ग्रामीण व शहरी भागात हाताला काम नाही. मुला मुलींना शिक्षण शिकवावे की, टीव्ही पॅकेज, केबल पॅकेज विकत घ्यायचे? हा प्रश्न समोर असल्याने केबल, टीव्ही बंद होत आहेत. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, सूचना व प्रसारण मंत्रालय विभागातील ट्राईच्या केबल, टीव्ही पॅकेज दर वाढविण्याच्या निर्णयापूर्वी केबल कनेक्शनधारकांना दर महिन्याला २०० रुपयांत सर्व चॅनलचे कार्यक्रम यात सिनेमा, बातम्या, सिरियल पाहता येत होत्या. परंतु, या दरात वाढ केल्याने केबल, टीव्हीचे सर्व चॅनलपाहता येणार नाही. आता या केबल, टीव्हीधारकांना मनोरंजनासाठी ४०० ते ५०० रुपयांचे पॅकेज विकंत घ्यावे लागत आहे. तसेच टीव्हीकरिता वेगवेगळ्या चॅनलचे दर निश्चित केल्याने ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन टीव्ही बंद होत आहेत.