दारव्हा (Farmer Committed Suicide) : तालुक्यातील लोही येथे सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या नितीन चव्हाण या शेतकर्याने १८ ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केली.
नितीन चव्हाण यांनी आपल्या चार एकर शेतजमिनीत सोयाबीन पेरले होते. पिकासाठी त्यांनी सुमारे ७० हजार रुपये खर्च केले होते, तसेच ५० हजार रुपयांचे कर्जही घेतले होते. परंतु, (Farmer Committed Suicide) अतिवृष्टीमुळे त्यांचे संपूर्ण शेत पाण्याखाली गेले आणि सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. यामुळे केवळ चार कट्टे सोयाबीनच हाती आले. या प्रचंड नुकसानीमुळे हताश आणि निराश झालेल्या नितीन यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
नितीन चव्हाण हे गावात मितभाषी आणि सर्वांना मदत करणारे म्हणून ओळखले जात होते. मात्र, सततच्या आर्थिक संकटांमुळे आणि शेतीतील अपयशामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या मागे पत्नी, आई आणि दोन लहान मुल असा आप्त परिवार आहे. या (Farmer Committed Suicide) घटनेने लोही गावात हळहळ व्यक्त होत आहे.