तीन घरांचे कुलूप तोडले; परभणीच्या वडगाव स्टे. येथील घटना
परभणी/गंगाखेड (Maharashtra Gramin Bank) : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव तालुका सोनपेठ येथे गुरुवार २७ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीला चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरांचे व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून (Maharashtra Gramin Bank) बँकेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हे चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव स्टेशन तालुका सोनपेठ येथे गुरुवार २७ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीपासून ते शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गावात धुमाकूळ घालत गावात असलेल्या (Maharashtra Gramin Bank) महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चॅनल गेट व दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत बँकेत असलेली पैशांची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बँकेजवळील रामा घाटूळे, सखुबाई वामनराव कांबळे व गावातील शामराव टोपाजीराव बचाटे यांची ही घरे फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
ही (Maharashtra Gramin Bank) घटना शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस येताच ७ वाजेच्या सुमारास पोलीस पाटील रामेश्वर काशिनाथ बचाटे यांनी घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली असता पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे, पोलीस हवलदार एकनाथ आळसे, पो. शि. शिवाजी बोमशेटे आदींसह अंगुली मुद्रा तज्ञ, श्वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मात्र तेथे काहीही मिळून आले नाही.
तिजोरीत होती मोठी रक्कम
अज्ञात चोरट्यांनी (Maharashtra Gramin Bank) महाराष्ट्र ग्रामीण बँक वडगाव स्टेशन शाखेच्या चॅनल गेट व दरवाज्याचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा या तिजोरीत ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम होती. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक परमेश्वर नागवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.