Pusad :- पुसद – नागपूर मार्गावरील पुस नदीच्या एका बाजूच्या पुलाचे पुर्ननिर्माण काम सुरु असल्याने दुसर्या बाजूच्या एकेरी पुलावर रहदारीचा पूर्ण ताण आहे. त्यातच सदर एकेरी पुलाच्या रस्त्यावर पावसामुळे असंख्य खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाल्याने नागरिकांना पुलावरून (Bridge) प्रवास करतांना जीव मुठीत धरून जावे लागते.
पुलावरील रस्त्याची झाली चाळणी
एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी मौत का कुंआ बनलेल्या सदर एकेरी पुलाचे खड्डे बुजवून दिलासा द्यावा अशी संतप्त नागरिकां कडून मागणी होत आहे.केंद्रीय रस्ते विकास निधी मधून२० कोटी रु खर्च करून मागील सुमारे ४ महिन्यांपासून पुस नदीवरील (Pus River)पुलाची उंची व रुंदी वाढविण्याचे काम सुरु आहे. जोडून असलेल्या या दोन पैकी एका पुलाचे सद्या काम सुरु आहे. त्यामुळे दुसर्या पुलावरून रहदारी सुरु आहे. नागपूर, माहूर मार्गासह ग्रामीण भागाची सर्व वाहने याच पुलावरून ये जा करीत असल्यामुळे पुलावर प्रचंड रहदारी असते. त्यातच बाजूला दुसर्या पुलाचे काम सुरु असल्यामुळे पुलावर अनेकदा रहदारी ठप्प होते. दरम्यान पावसामुळे रहदारी सुरु असलेल्या या पुलाला असंख्य खड्डे पडून चाळणी झाल्याने वाहन चालक जीव मुठीत धरून जात असतात. इटावा व त्या भागातील ग्रामीण विद्यार्थी शहरात शाळा व ट्युशन साठी याच पुलावरून येत असल्यामुळे पालकांचा जीव टांगणीला असतो.
त्यामुळे रहदारी सुरु असलेल्या पुलावरील ख्ाड्डे त्वरित बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे.तसेच पुलाच्या बाजूला नाग देवता मंदिर लगत जमिनीला खड्डा पडल्याने रहदारी जास्त झाल्यास या खड्ड्यात वाहन चालक पुलात पडू शकतो. त्यामुळे या भागात कठडे लावण्याची गरज आहे. दरम्यान निर्माणाधीन पुलाचे काम युद्ध पातळी वर करून रहदारी ला खुला करून द्यावा अशीही मागणी होत आहे