हिंगोली (Hingoli Municipality) : शहरातील सिध्दार्थ नगर भागामध्ये असलेल्या मोठ्या नगरात काही वनागरीकांनी मोठे पाईप टाकल्याने गतवर्षी पाण्याचा मोठा प्रवाह रहिवाशी वस्तीमध्ये घुसला होता. क त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्याकरीता बुधवारी नगर पालिकेच्या पथकाने जेसीबी लावून पोलिस बंदोबस्तात – नाल्यातील पाईप हटविले.
सिध्देश्वर नगरातील मोठ्या नाल्यातून पावसाचे पाणी जलेश्वर तलावामध्ये सोडले जाते. परंतु गतवर्षी या भागातील काही नागरीकांनी मोठ्या नाल्यात पाईप टाकल्याने नाल्यातील पाणी रहिवाशी वस्तीमध्ये घुसले होते. परिणामी सिध्दार्थ नगर, इंदिरा नगर आदी भागात पावसाचे मोठे पाणी घुसल्याने हाहाकार उडाला होता. त्यामुळे यावेळी संभाव्य धोका टाळण्याकरीता मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ९ जुलै रोजी नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात या मोठ्या नाल्यातील टाकण्यात आलेले पाईप हटविण्यात आले.
सदरील पाईप हटविल्यामुळे आता भविष्यात पावसाचे पाणी नाल्यातून जलेश्वर तलावात सोडले जाणार आहे. या मोहीमेत मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह नगर अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अग्निशमन दलाचे प्रमुख आकाश तांडेल, शाम माळवटकर, संदिप घुगे, देविसिंग ठाकुर, शाम कदम, स्नेहल आवटे, शिवाजी घुगे, कैलास थिट्टे, पंडीत मस्के, आकाश देशमुख, नितीन पहीनकर, दिनेश वर्मा, विजय शिखरे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.