११७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
परभणी (Gram Panchayat Reservation) : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. परभणी तालुक्यातील एकूण ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन २०२५- २०३० साठीची आरक्षण सोडत सोमवार १४ जुलै रोजी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता आरक्षण (Gram Panchayat Reservation) सोडत जाहीर करण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे यांना प्राधिकृत करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार विष्णू पकवाने, नायब तहसिलदार सुनील कांबळे, नायब तहसिलदार डॉ. राजकुमार राठोड, सहाय्यक महसूल अधिकारी मदन चव्हाण यांची उपस्थिती होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या मधील आरक्षण तसेच महिलांसाठीचे आरक्षण याची सोडत पारदर्शक पध्दतीने राबविण्यात आली.
आरक्षण सोबत या प्रमाणे अनुसूचित जाती : धोंडी, नांदापूर, जलालपूर, मांगणगाव (महिला), लोहगाव (महिला), शिर्शी खु. (महिला), वांगी (महिला), काष्टगाव, कुंभारी, दैठणा (महिला), मिर्झापूर, उखळद (महिला), पिंपळगाव टोंग, तरोडा (महिला), सिंगणापूर, झरी (महिला).
अनुसूचित जमाती : रायपूर (महिला), वडगाव तर्फे टाकळी.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) : भारस्वाडा, साडेगाव, ब्रम्हपुरी तर्फे पाथरी (महिला), पिंपरी देशमुख, धसाडी (महिला), शिर्शी बू. (महिला), बलसा खु. (महिला), डिग्रस (महिला), नरसापुर (महिला), मुरुंबा, हिंगला, पोरवड (महिला), गोविंदपुर (महिला), पोरजवळा (महिला), सहजपूर जावळा (महिला), तामसवाडी, बोरवंड खु., अंगलगाव (महिला), सावंगी खु., मटकर्हाळा, नागापूर, बोरवंड बु., पिंगळी (महिला), पिंपळगाव (स. मि), हसनापूर (महिला), धर्मापूरी, कैलासवाडी, दामपूरी (महिला), साळापूरी, किन्होळा (महिला), मांडाखळी (महिला), साटला.
सर्वसाधारण : पेडगाव, टाकळी कुंभकर्ण, उमरी (महिला), जोडपरळी, पोखर्णी, सनपुरी (महिला), कारेगाव, मिरखेल, आर्वी (महिला), असोला (महिला), टाकळी बोबडे, ईठलापूर देशमुख, नांदखेडा, आमडापूर, संबर (महिला), बाभळी (महिला), वडगाव तर्फे भारसवाडा, नांदगाव खु. (महिला), भोगांव (महिला), टाकळगव्हाण, सुरपिंपरी (महिला), सोन्ना, वाडीदमई (महिला), समसापूर, आळंद, नांदगाव बु., झाडगांव (महिला), ठोळा, जांब (महिला), पिंगळी कोथाळा (महिला), ताडलिमला (महिला), पेगरगव्हाण (महिला), पारवा (महिला), माळसोन्ना (महिला), पिंपळगाव ठोंबरे, परळगव्हाण, तट्टूजवळा (महिला), शहापूर (महिला), साबा, पान्हेरा (महिला), दुर्डी, करडगांव (महिला), करडगांव, धारणगांव, ताडपांगरी, मांडवा (महिला), उजळंबा (महिला), दैवठाणा (महिला), राहटी, पांढरी (महिला), एकरुखा तर्फे पेडगाव (महिला), कोटंबवाडी, इंदेवाडी (महिला), पिंपळा, पाथरा (महिला), वरपुड, आनंदवाडी, ब्रम्हपुरी तर्फे पेडगांव, सायाळा खटिंग (महिला), आंबेटाकळी, धार (महिला), आलापुर पांढरी, ईस्माईलपूर (महिला), डफवाडी (महिला), ब्राह्मणगाव (महिला), बाभुळगाव (महिला).
असे आहे आरक्षण
परभणी तालुक्यातील एकूण ११७ ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जाती १६, अनुसूचित जमाती २, नागरीकांचा मागास प्रवर्ग ३२ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६७ या प्रमाणे आरक्षण काढण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी विराट पंकज शहाणे या लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून (Gram Panchayat Reservation) आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीसाठी निवडणूक विभागाचे बाळासाहेब साळवे, पठाण वसीम अहेमद खान, सय्यद शकिल, पंकज शहाणे, संतोष लाटकर, मोहम्मद सलाहोद्दीन आदींनी परिश्रम घेतले.