९ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त,दोघाविरोधात गुन्हा दाखल
गडचिरोली (Tobacco smuggling) : प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची तस्करी करणार्या दोन तस्करांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळून त्यांच्याकडून ९ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त (Tobacco smuggling) केल्याची कारवाई काल २२ एप्रिल रोजी अर्जुनी ते देसाईगंज मार्गावर केली. याप्रकरणी अस्पाक मुन्ना शेख( २५) रा. संजयनगर पिंडकेपार, जि. गोंदिया ,रवी मोहनलाल खटवानी, रा. गोंदिया यांना ताब्यात घेतले आहे.
अर्जुनी ते देसाईगंज मार्गे चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू देसाईगंज हद्दीतील चिल्लर (Tobacco smuggling) तंबाखू विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती गडचिरोली येथील गुन्हे शाखेस मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुनी ते देसाईगंजकडे जाणार्या रस्त्यावर सापळा रचला. सिल्व्हर रंगाची टोयोटा कंपनीची ईनोव्हा चारचाकी वाहन येत असताना दिसून आल्याने सदर वाहनाला तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबविण्यात आले.
वाहनाची झडती घेतली असता वाहनात ५,४४,३०४ रुपये किंमतीचा अवैध सुगंधित तंबाखू (Tobacco smuggling) मिळून आला. वाहन चालकास सुगंधित तंबाखूबाबत विचारपूस केली असता, त्याने सदरची सुगंधित तंबाखू हा गोंदिया येथील रवी मोहनलाल खटवानी याचा असल्याचे सांगितले. यावरुन वाहनातील ५,४४,३०४ रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू व सुगंधित तंबाखू वाहून नेण्याकरिता वापरात आणलेली ३,८०,००० रुपये किंमतीची इनोव्हा चारचाकी वाहन क्र. एम.एच.-१५-बी.एन.-५६८९ असा एकूण ९,२४,३०४ रुपये किंमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार (Tobacco smuggling) आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आगरकर हे करीत आहेत.




