चौकीचे दरवाजे राहतात कायम कुलूपबंद
पोलीस प्रशासनाची होतेय डोळेझाक
पोलीस प्रशासनाची होतेय डोळेझाक
परभणी (Jintur Police Station) : जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या संवेदनशील भागात उभारलेली पोलीस चौकी मागील काही महिन्यांपासून फसवी इमारत ठरत आहे. कारण चौकीचे दरवाजे कायम कुलूपबंद, कर्मचारी गायब आणि सुरक्षेचे कार्य रामभरोसे सुरु आहे. सुरक्षेच्या नावाखाली उभारलेली चौकी प्रत्यक्षात फक्त इमारत राहिली असून, याकडे पोलीस प्रशासनाने डोळेझाक केली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तत्कालीन (Jintur Police Station) पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या दिमाखात चौकी उभारली होती. ही चौकी काही महिने सुरू राहिली. मात्र त्यानंतर कर्मचारी गायब झाले. आज चौकीचे दरवाजे कायम कुलूपबंद असून, इमारत आहे पण पोलीस नाहीत असे चित्र आहे. म्हणून या भागात वारंवार किरकोळ वाद, संशयास्पद हालचाली आणि गुन्हेगारी प्रकार घडत असून, पोलिसांचा मागमूस नसल्याने नागरिक भयभीत आहेत. कारण गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि चौकी मात्र सजावटीची इमारत झाली आहे.
कर्मचारी द्या नाहीतर चौकी हटवा
ज्या ठिकाणी पोलिसांची गरज आहे, तिथे तेच नाहीत! मग चौकीच्या नावाखाली जनता किती दिवस फसवली जाणार?” फक्त शोभेची इमारत ठेवून काही उपयोग नाही. चौकीत किमान दोन-तीन पोलीस कायमस्वरूपी नेमा, नाहीतर ही फसवी चौकी हटवा,” असा सवाल नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे.
प्रशासनावर जनतेचा अविश्वास
संवेदनशील ठिकाणी सुरक्षेची घडी कोलमडलेली असताना प्रशासन मात्र गप्प आहे. जनतेच्या सुरक्षेशी असा खेळ का? जबाबदार कोण? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
चौकी की फसवी इमारत?
दरवाजे कायम कुलूपबंद, चौकी फक्त कागदोपत्री कार्यरत
कर्मचारी नसल्याने परिसर सुरक्षाविहीन गुन्हेगारी हालचालींना मिळतेय मोकळे मैदान पोलीस प्रशासन मात्र गप्प व निष्क्रिय