नांदेड (Sri Ved Society) : “समाजात जन्मलो म्हणजे समाजाचे देणे लागतो” या विचारांवर आधारित (Sri Ved Society) श्री वेद मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नांदेडच्या नायगाव शाखेचा तिसरा वर्धापन दिन मंगळवारी नायगाव येथे मोठ्या दिमाखात पार पडला. आई तुळजाभवानी देवीच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी केशवराव पाटील चव्हाण होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, सोसायटीचे चेअरमन मारोतराव कंठेवाड,भगवानराव पाटील लंगडापुरे, माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील कल्याण, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी शंकरराव चांडोळकर, संचालिका शर्मिला कंठेवाड,कार्यकारी संचालिका सविता कंठेवाड,काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दिलीप पांडरे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक पाटील चव्हाण, जिजाऊ संकुलचे अध्यक्ष भास्कराव पाटील शिंदे, मनोहर अप्पा साधू आणि शाखा व्यवस्थापक मारोती तेलंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने झाली. त्यानंतर (Sri Ved Society) सोसायटीचे संचालक नागनाथ अनंतवाड यांनी प्रास्ताविक भाषणात सोसायटीच्या अल्पावधीतील यशाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नायगाव शाखेला नायगावकरांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. सध्या या शाखेची सदस्य संख्या ५,६४७ असून, भागभांडवल १६ कोटी ५० लाख आणि ठेवी ४५ कोटी ५० लाखांवर पोहोचल्या आहेत. सोसायटीने शेतकरी, लघु उद्योजक, दुकानदार आणि गाडीवाल्यांसारख्या समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक मदत केली आहे.
अनंतवाड यांनी या प्रगतीचे श्रेय चेअरमन मारोतराव कंठेवाड यांच्या दूरदृष्टीला आणि सभासद व ठेवीदारांच्या अखंड सहकार्याला दिले. ‘प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत (Sri Ved Society) श्री वेदच्या माध्यमातून पोहोचता आले, याचे एक वेगळे समाधान मिळते,’ असेही त्यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक केले. ‘सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास हेच संस्थेचे सर्वात मोठे भांडवल आहे,’ असे सांगत त्यांनी नायगाव शाखेच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली यांनी केले, तर आभार संस्थेच्या एम.डी. सविता कंठेवाड यांनी मानले.
“श्री वेद मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी (Sri Ved Society) गेल्या दहा वर्षांपासून सभासदांच्या ठेवी स्वीकारून गरजूंना कर्ज वाटप करणारी संस्था बनली आहे. नायगाव (बा.) शाखेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या संस्थेच्या १० वर्षांच्या प्रवासात तुम्ही जो विश्वास दाखवला, त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत.”
-मारोतराव कंठेवाड, चेअरमन, “श्री वेद मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी