कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील घटना!
आखाडा बाळापूर (Theft of Jewelry) : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील सोन्या-चांदीच्या (Gold and Silver) दुकानातून दोन महिला व दोन मुलींनी दहा कीलो चांदी सात लाख रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. सदर प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला. पोलीस अधिकारी-कर्मचार्यांच्या पथकाने (Police Officer-Employee Team) घटनास्थळी भेट देऊन चोरीचा तपास सुरु केला आहे. दुकानात आलेल्या महिलांसह मुली सीसीटिव्हीमध्ये (CCTV) कैद झाल्या आहेत.
तब्बल सात लाख रूपये किंमतीचे ऐवज चोरी झाल्याने खळबळ!
कळमनुरी तालुक्यातील कृष्णापुर येथील ज्ञानेश्वर श्रीकृष्ण बहिवाळ यांचे वारंगा फाटा येथे हनुमान ज्वेलर्स सोन्या-चांदीच्या दाग-दागिन्याचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी दोन महिला व दोन मुली अंदाजे पंधरा वर्षे व आठ वर्षे वयोगटातील दुकानात आल्या. त्यांनी दहा कीलो चांदी किंमत सात लाख रूपयाचे दागिनेअसलेली बॅग चोरून नेली. रात्री सदर प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात (Balapur Police Station) अज्ञात महिला व मुली विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, शेख बाबरभाई, शिवाजी पवार, प्रभाकर भोंग पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. तब्बल सात लाख रूपये किंमतीचे ऐवज चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.