तक्रार करायची तर कोणाकडे ?
लक्ष्य कोण देणार?
लक्ष्य कोण देणार?
परभणी (Gangakhed Main Road) : गंगाखेड शहरातुन जाणार्या नांदेड पुणे या (Gangakhed Main Road) मुख्य महामार्गांवर जागोजागी खड्डेच खड्डे झाले असुन परळी नाका परिसरातील महाराणा प्रताप चौकातून परभणीकडे जाणार्या महामार्गावर अंदाजे एक ते दीड फुट खोलीचा व दहा ते बारा फूट लांबीचा भला मोठा खड्डा पडला असुन तो वाहन धारकासाठी जीवघेणा ठरत आहे.
असे असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागासह महामार्ग विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. गंगाखेड ते परभणी महामार्गावर शहरातील परळी नाक्यावरील मुख्य चौक असलेल्या महाराणा प्रताप चौकात पडलेले मोठं मोठे खड्डे दुचाकी व अन्य वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत असुन चार, सहा चाकी वाहन धारकांना ही येथून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Gangakhed Main Road) मुख्य महामार्गावर पडलेले हे खड्डे चुकविताना दर दिवशी येथे छोट्या- मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहे.
महाराणा चौकातील गंगाखेड परभणी महामार्ग तसेच परळी व पालमकडे जाणार्या नांदेड पुणे महामार्गावर शहरातील परळी नाका ते पालम रस्त्यावरील श्री दत्त मंदिर चौका दरम्यान वीज वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. केंद्र, उपजिल्हा रुग्णालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर, चांद तारा चौक व मस्जिद समोर, जुना शनिवार बाजार परिसर, भगवती कॉर्नर व बस स्थानकासमोरील उड्डाणपुला नजीक तसेच पालम रस्त्यावरील ईटाळशी नदीच्या पुलावर, दत्त मंदिर चौक आदी ठिकाणी पडलेले जिवघेणे खड्डे तात्काळ बुजवावे, अशी मागणी वाहन धारकांसह शहर वासियांतून केली जात आहे.
गंगाखेड शहरातून जाणारा नांदेड – पुणे महामार्ग असो वा गंगाखेड – परभणी मार्ग असो हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत नाही हे महामार्ग विभागाच्या लातूर, नांदेड व जालना अशा तीन हद्दीत येत असल्यामुळे हद्दीच्या वादात गंगाखेड शहरातील (Gangakhed Main Road) मुख्य महामार्गवरील खड्डे अडकून पडले असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो हा रस्ता महामार्ग विभागाकडे आहे तर महामार्गाचे अधिकारी सांगतात हा भाग लातूर विभागात येतो, लातूर विभागवाले अधिकारी सांगतात हा भाग जालना विभागाकडे येतो तर जालनावाले सांगतात हा भाग नांदेड विभागाकडे येतो. त्यामुळे तीन किलोमीटरचा रस्ता तीन विभागात वाटण्याचा महापराक्रम कोणत्या महाभागाने केला असा संतप्त सवाल ही गंगाखेड वासीयातून उपस्थित केला जात आहे.
नागरीकांसह वाहन धारकांत संताप
मुख्य मार्गावर परळी नाका परिसरात पडलेला भला (Gangakhed Main Road) मोठा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महामार्गाचे अधिकार्यांना कसा दिसला नाही हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी याकडे लक्ष द्यायला संबंधित विभागास वेळ मिळत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा भावना व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग विभाग भविष्यात या ठिकाणी घडणार्या एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का ? असा संतप्त सवाल वाहन धारकांसह जनतेतुन उपस्थित केला जात आहे.