सोनपेठ(Parbhani):- सुशिक्षित बेरोजगारांना व युवकांना स्वत:च्या पायांवर उभा राहता यावे यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी राजेश विटेकर यांच्या सारख्या उच्च शिक्षित (Highly educated) तरुण उमेदवारला विधानसभेत पाठविले पाहिजे असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना व्यक्त केले आहे.
आ. राजेश विटेकर यांना ठिक ठिकाणी वाढता पाठींबा
पाथरी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार आ. राजेश विटेकर यांच्या प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती अमर पाटील, शिवाजी कदम रोहन सामाले संतोष कोल्हे, अंजिक्य नखाते, छत्रगुण बोंबले, यांच्या आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सूरज चव्हाण म्हणाले की, पाथरी विधानसभा मतदारसंघातील युवकांना स्वतः च्या पायांवर उभा राहण्यासाठी रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सद्या निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू झाली आहे. यामध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व आपल्या हक्काचा आवाज विधानसभेत गेला पाहिजे. त्यासाठी तरूण तडफदार युवा नेतृत्व उच्च शिक्षित असलेल्या महायुतीचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांना आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत पाठवलेच पाहिजे असे शेवटी मत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला महायुतीसह घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.