चिखली (Buldhana) :- शेतात सोयाबिन (Soybean) सोगणीला सुरवात होताच अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा पाऊस सुरू झाला आणि पळसाच्या झाडाखाली बसलेल्या पती पत्नी व शेतमालकावर विज कोसळली त्यामध्ये एका जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली.
शेतमालकावर विज कोसळली; एका जणांचा मृत्यू
चिखली तहसिलदार याच्याकडे तलाठी यांनी दिलेल्या पंचणाम्या मध्ये नमुद केले आहे की संभाजी नगर येथील किशोर माधवराव देशमाने यांच्याकडे पांबुळवाडी शिवारात गट न १२ मध्ये एक एकर जमीन आहे. या जमिनी मध्ये त्यांनी सोयाबिन पेरली होती. त्यामुळे त्यांनी घरा शेजारील सोयाबिन सोगणी करणारे मजूर शेतात घेतात घेवून गेले . सोयाबीन सोंगणीला सुरवात होताच अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा पाऊस (Rain)सुरू झाला त्यामुळे मजूर धावत शेतातून बाहेर जावू लागले. त्यामध्ये अमोल देविदास जाधव वय ४२ वर्ष व त्यांची पत्नी सौ शीतल अमोल जाधव वय ३५ आणि शेत मालक किशोर माधवराव देशमाने वय ५९ हे शेतातील एका पळसाच्या झाडाखाली थांबले तेवढ्यात अचानक सततधार पावसामध्ये वीज कोसळली आणि तिघा जनाच्या अंगावर पडली त्यात अमोल देविदास जाधव वय ४२ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी व शेत मालक गंभीर जखमी झाले.
हा प्रकार गणेश विर यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच बैलगाडी घेवून त्यांच्या जवळ पोहचले असता महिला व शेत मालक बेशुध्द अवस्थेत पडलेले पाहून लगेच त्यांना उचलून बैल गाडी मध्ये पुराच्या पाण्यातून बाहेर आनले आणि चिखली येथील पानगोळे रुग्णालयात भरती केले. आज रोजी जखमीवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत .